• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING NEWS: शरद पवारांचे विश्वासू नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक

BREAKING NEWS: शरद पवारांचे विश्वासू नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती.

 • Share this:
  मुंबई, 29 जून: महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA government) बैठकांचं सत्र सुरूच आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी 'नरेंद्रभाई', राऊतांचं सूचक विधान दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहे. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या विषयावर मतभेद असू शकता पण नाराजी नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचे व्यवस्थित सुरू आहे' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच, पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी 'नरेंद्रभाई' आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही. सर्वकाही व्यवस्थित आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पण केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. तीन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे थोडे फार मतभेद होतीलच. पण, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात. पण नाराज कुणीच नाही, विरोधी पक्षाला हवे असलेले घडत नाही, त्यामुळे अफवा पसरवल्या जात आहे, असंही राऊत म्हणाले. यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच! राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी जाहीर केली नियमावली 'अनिल देशमुख, प्रताप सरनाईकांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांची कोंडी केली जात आहे. भाजपमध्ये धुतल्या तांदळाचे आहेत का? हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ? तिन्ही पक्ष यावर एकत्र बसून पुढील वाटचाल ठरवली जाईल, असंही राऊत म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published: