पंकजा मुंडेंच्या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडेंचा टोला, म्हणाले...

पंकजा मुंडेंच्या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडेंचा टोला, म्हणाले...

'पाच वर्ष भाजपची सत्ता होती मात्र त्यांना साधं गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक करता आलं नाही हे अतिशय दुर्दैवी आहे.'

  • Share this:

मुंबई 12 डिसेंबर : मी पराभवामुळे खचून जाणारी व्यक्ती नाही. मी संघर्ष करत राहणार, असं सांगताना पंकजा मुंडे यांनी 26 जानेवारीली गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्याची घोषणा केली. दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसानिमित्त परळीजवळच्या गोपीनाथ गडावरून भाषण करताना त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. "आता मी मुक्त आहे. मी आता आमदारही नाही. पक्षाच्या कोअर कमिटीमधून मला मुक्त करा. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर", असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यांच्या या आक्रम भाषणावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. हे केवळ पेल्यातलं वादळ असून ते पेल्यातच शमणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अजित पवारांना एकाच दिवसात दुसरा धक्का, जाणून घ्या काय झालं!

धनंजय मुंडे म्हणाले, मी यावर फार बोलणं योग्य होणार नाही. मात्र हे फक्त पेल्यातलं वादळ आहे आणि ते पेल्यातच शमणार आहे. पाच वर्ष भाजपची सत्ता होती मात्र त्यांना साधं गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक करता आलं नाही हे अतिशय दुर्दैवी आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या आधी त्यांनी एक ट्वीट करत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजलीही व्यक्त केली होती.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पद मिळवण्यासाठी मी दबावतंत्र वापरते, असे माझ्यावर आरोप झाले. मी आता कोअर कमिटीचासुद्धा राजीनामा देते आहे, असं पंकजा मुंडे गोपिनाथ गडावरच्या कार्यक्रमानंतर बोलताना म्हणाल्या. "मी संघर्ष करणार, काम करणार. माझ्या लोकांनी घाबरू नये. 26 जानेवारीला मुंबईत कार्यालय सुरू करणार आहे. तिथून गोपिनाथ प्रतिष्ठानचं काम करणार. 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार", असं त्या म्हणाल्या. 2014 भाजपचा मुख्यमंत्री करण्यास योगदान दिलं आता कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी पंकजा यांनी केली. मला मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हटलं तर त्यात काय चुकीचं, असंही त्या म्हणाल्या.

अखेर खातेवाटप जाहीर, गृह खातं शिवसेनेकडे तर तिजोरीच्या किल्ल्या राष्ट्रवादीकडे

एका महिलेनं राज्याचं नेतृत्व करण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात चूक काय, असा सवाल त्यांनी केला. "मी आधी परळीची होते आता राज्याची आहे. पंकजा मुंडे बेईमान होणार नाही. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. आता भाजपच्या कोर्टात बॉल आहे. पक्षानं जे करायचं ते करावं", असं पंकजा म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 09:42 PM IST

ताज्या बातम्या