भुजबळ- राज ठाकरे यांच्यात चर्चा, पाहा भेटीचे EXCLUSIVE PHOTOS

या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2019 10:42 PM IST

भुजबळ- राज ठाकरे यांच्यात चर्चा, पाहा भेटीचे EXCLUSIVE PHOTOS

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

ही भेट कौटुंबिक कारणासाठी घेतल्याचा दावा केला जात असला तरीही या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवेळी भुजबळ यांच्या सोबत त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकजही उपस्थित होते.

Loading...

मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मनसे लोकसभेच्या एकूण 3 जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली.

त्यामुळे आता भुजबळांच्या भेटीनंतर आगामी काळात मनसे महाआघाडीत सामील होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 10:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...