मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई पालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे वाद, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेवर नाराज

मुंबई पालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे वाद, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेवर नाराज


मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि शिवसेना यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची नाराज असल्याची माहितीसमोर आली आहे

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि शिवसेना यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची नाराज असल्याची माहितीसमोर आली आहे

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि शिवसेना यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची नाराज असल्याची माहितीसमोर आली आहे

मुंबई, 05 फेब्रुवारी : महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा गाजत असतानाच आता आणखी एका मुद्दावरून राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते शिवसेनेच्या (Shivsena) भूमिकेवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचे आयुक्त इकबाल चहल (Mumbai Commissioner Iqbal Chahal) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे.

मुंबई महापालिका (mumbai municipal corporation)आयुक्त इकबाल चहल आणि शिवसेना यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची नाराज असल्याची माहितीसमोर आली आहे. मुंबईसाठी नियोजन करणार्‍या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावं, अशी चहल यांनी भूमिका मांडली आहे. शिवसेनेनं सुद्धा हीच भूमिका मांडली आहे.

Petrol Price: पुण्यामध्ये पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर! 93 रुपयांनी होतेय विक्री

मुंबई महापालिकेचे बजेट सादर करताना महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी एका प्राधिकरणाच्या प्रस्ताव दिल्याचे नमूद केले आहे.  मुंबईत म्हाडा, SRA, MMRDA अशी विविध नियोजन प्राधिकरणे आहेत. या प्राधिकरणाची जबाबदारी देखील विविध पक्षात वाटून दिली आहे.

असं असताना महाविकास आघाडी सरकारला विचारात न घेता आयुक्तांनी कोणाच्या सांगण्यावरून प्रस्ताव दिला, असा सवाल आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील  नेत्यांनी विचारला आहे.  त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटले आहे.

एका व्यक्तीच्या PF खात्यामध्ये 102 कोटी रुपये! आश्चर्यकारक माहिती आली समोर

कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना याबाबत तिन्ही पक्षांमध्य चर्चा अपेक्षित असते. पण तसे न होता थेट मुंबई अर्थसंकल्पात हा उल्लेख आल्याने काही मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन महापालिका आयुक्त असावे, असं मत मांडले होते. त्याबाबत विचार अद्याप केलेला नाही, त्यात मनपा आयुक्त यांनी वेगळाच प्रस्ताव ठेवला. गृहनिर्माण विभाग अंतर्गत म्हाडा पुर्नविकास परवानगी विषय ही मनपा स्वत: हाताळू पाहत आहे, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

First published: