Home /News /mumbai /

'स्वराज्यरक्षक संभाजी'वरून उलट सुलट चर्चा, वाचा काय म्हणाले अमोल कोल्हे

'स्वराज्यरक्षक संभाजी'वरून उलट सुलट चर्चा, वाचा काय म्हणाले अमोल कोल्हे

ऐतिहासिक मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

    मुंबई,5 फेब्रुवारी: ऐतिहासिक मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र, ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत असल्याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावर मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे ट्वीट करुन खासदार कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरुबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पाहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरुर टिप्पणी करावी. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही, अशे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका 25 सप्टेंबर 2017 पासून सुरु आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश:डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप 5 मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने 500 एपिसोड पूर्ण केले होते. परंतु, आता फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय दबावामुळी ही मालिका बंद केली जाणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Maharashtra news

    पुढील बातम्या