मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरलाय का? अजित पवारांनी केला खुलासा

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरलाय का? अजित पवारांनी केला खुलासा

Mumbai: NCP leader Ajit Pawar leaves after attending a meeting of Maharashtra Vikas Aghadi leaders at YB Chavan Centre, in Mumbai, Wednesday, Nov. 27, 2019. (PTI Photo)  (PTI11_27_2019_000278B)

Mumbai: NCP leader Ajit Pawar leaves after attending a meeting of Maharashtra Vikas Aghadi leaders at YB Chavan Centre, in Mumbai, Wednesday, Nov. 27, 2019. (PTI Photo) (PTI11_27_2019_000278B)

मंत्रिमंडळाचा विस्तार हा विश्वास दर्शक ठरावानंतर होईल. आज पक्षाने जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना शपथ घेण्याचा आदेश दिला.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आता काही तासांमध्ये शपथ घेणार आहेत. त्यावेळी अजित पवार नाराज असल्याचं पुन्हा एकदा पुढे आल्यानं खळबळ उडाली होती. तर अजित दादा नॉटरिचेबल आहेत असंही सांगितलं जात होतं. नंतर अजित पवार हे संपर्कात असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. नंतर अजित दादा हे शरद पवारांच्या भेटीलाही आले होते. त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा प्रदीर्घ चर्चा झाली. राष्ट्रवादीचा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री असावा असा आग्रह अजित पवारांनी धरल्याचं पुढे येतंय. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी त्याबद्दल खुलासा केलाय. त्यात भर पडलीय ती छगन भुजबळांचं ताजं वक्तव्याची. 'आजच्या शपथविधीसाठी शरद पवारांनी दोन नेत्यांना निवडलंय, त्यातला एक मी आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

विधानसभा अध्यक्ष ठरेना! काँग्रेसच्या 'या' नेत्याची राष्ट्रवादीला अडचण

पुण्यात महात्म फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ उपस्थित होते. तिथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना भुजबळ म्हणाले, "राष्ट्रवादीचे 2 नेते आज शपथ घेतील. पवारांनी जी दोन माणसं निवडली आहेत, त्यातला एक मी आहे." भुजबळांच्या या वक्तव्यावर त्यांना अजित पवारांच्या मंत्रिपदाबद्दल विचारल्यावर, "अजित पवारांच्या मंत्रिपदासंबंधीचा निर्णय शरद पवारच घेतील", असं ते म्हणाले. "अजितदादांनी परत यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. जी जबाबदारी शरद पवार अजित पवारांवर टाकतील ते ती निभावतील", असंही त्यांनी सांगितलं होतं.

संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींबद्दल मोठं विधान; खडसेंबद्दलही केला गौप्यस्फोट

अजित पवार म्हणाले, आज सर्वच पक्षांचे दोन दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. मी आज शपध घेणार नाही. मंत्र्यांची नावं ही कळविण्यात आली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा विश्वास दर्शक ठरावानंतर होईल. आज पक्षाने जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना शपथ घेण्याचा आदेश दिला असं ते म्हणाले. मी नाराज नाही. शपथविधीला जाणार आहे. सुप्रिया सुळेंना सोबत घेऊन मी शपधविधीला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी नाराज नाही, पक्ष जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल असंही ते म्हणाले. मी बंड केलं नव्हतं. मी एक भूमिका घेतली होती. त्याबद्दल मी योग्य वेळी खुलासा करेन. त्याबद्दल केव्हा बोलावं हा माझा अधिकार आहे.
First published:

Tags: Ajit pawar

पुढील बातम्या