मुंबई, 14 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार हे आपल्या भाषणामुळे कायम चर्चेत असतात. अलीकडेच त्यांचा डोळा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण, आपण डोळा का मारला आणि त्या मागे उद्देश काय होता, याचा खुलासा अजित पवार यांनी केली आहे. एका पत्रकाराला प्रश्नाचे उत्तर नंतर देतो, हे सांगण्यासाठी डोळा मारला होता, असं अजितदादांनी स्पष्ट केलंय.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यूज18 लोकमतला विशेष मुलाखत दिली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी विचारलेल्या अनेक राजकीय प्रश्नांना अजितदादांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली.
डोळा का मारला?
'माझं त्या दिवशी पोडियमवर बोलणं झालं होतं. त्यावेळी पाठीमागून कुणी तरी सांगितलं, उद्धव ठाकरे आले आहेत. त्यामुळे मी बाजूला झालो. त्यावेळी मी एक डोळा मारला आहे. त्याच्यात काय झालं. एक पत्रकार मित्र होता, तो माला एकच प्रश्न आहे, तो विचारू द्या, असं म्हणत होता, मी त्याला म्हटलं थांब रे, साहेबांचं होऊ दे मग मी बोलतो. असं ते झालं होतं. बोलताना थांब म्हणण्याऐवजी, डोळा मारला. आता त्या व्हिडीओचा एवढा गाजावाजा केला की, अजितदादांनी डोळा का मारला, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली. त्याला अर्थच नाही, असा खुलासा अजित पवारांनी केला.
(maha power struggle : उद्धव ठाकरेंची खेळी अंगलट येणार? हरीश साळवेंचा कोर्टात मोठा दावा)
पण हे का झालं, अलीकडच्या काळात चॅनल जास्त झाले आहे, जास्त आणि काहींना काही दाखवा लागतं. 13 कोटी जनतेमधील काही लोकांपैकी लाईक तरी करतील. कधी कधी काही गोष्टी सत्यता न पारखता दाखवलं जात असतं, याचा माध्यमांनी विचार करावा, असा सल्लाही अजित पवारांनी दिला.
शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दुरावा?
मला तसं दिसत नाही, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चांगलं जमतं. काही पक्षामध्ये असे नेते असतात थोडसं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो असा विचार केला पाहिजे, अशी काही लोक वेगवेगळ्या पक्षात असतात. काँग्रेसमध्ये कुणी काही म्हटलं तरी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगे हेच निर्णय घेणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळेच नेते उपस्थितीत होते.
उद्धव ठाकरेंबद्दल आदर
'शेवटी आपली काही परंपरा आहे, आम्ही अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्याचे प्रमुख होते. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी काम केलं आहे. राज्याला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे मी त्या दिवशी त्यांना बोलण्यासाठी बाजूला झालो.
(BREAKING : हसन मुश्रीफांना दिलासा, अटक टळली, कोर्टाने 'ईडी'गिरीला फटकारलं)
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती
आता पहिले टार्गेट आहे, सगळ्यांचं मिळून सरकार कुणाचं येणार हे महत्त्वाचं आहे. उगाच गुडघ्याला बाशिंग बांधण्यात काही अर्थ नाही. लोकांचा जनाधार कसा मिळेल, महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत कशी येणार, या गोष्टीला माझं महत्त्व आहे, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
गौतमी पाटीलवर आक्षेप का?
अशा विषयांमध्ये फार काळ नाराजी फार काळ ठेवायची नसते. एखाद्याने गोष्ट केली, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपली परंपराच आहे, आपल्याकडून काही चुकलं तर दिलगिरी व्यक्त करून पुढे जातो. पण काही जण आपल्या मतावर ठाम असतात, तिथे मात्र प्रॉब्लेम होतो, तिथे नवी प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी समजूदारपणा दाखवला पाहिजे. आमच्या पक्षातील कार्यकर्ते हे पक्षाच्या बॅनरखाली गौतमी पाटीलचे कार्यक्रम घेत होते. म्हणून मी बोललो. कलावंतांनी आपली कला सादर करत असताना जी काही नियमावली ठरवली आहे, त्यानुसार कला सादर केली तर कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar