राष्ट्रवादीत भूकंप; अजित पवार 'नॉट रिचेबल'

राष्ट्रवादीत भूकंप; अजित पवार 'नॉट रिचेबल'

या आधीही काही वेळा अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत निर्णय घेतले होते. त्यामुळे अजित पवारांनी का राजीनामा दिला याबद्दल चर्चेला उधाण आलंय.

  • Share this:

मुंबई 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिलाय. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार 'नॉट रिचेबल' आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलंय. त्यामुळे नेमकं काय झालं याबद्दल सस्पेन्स वाढला असून राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी ई मेलवरून बागडेंना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात, गूढ वाढलं

ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे दिसले नाहीत. ते निर्णय प्रक्रियेपासून दूर होते. पक्षातल्या काही घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चाही आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात अस सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होत. पवार कुटुंबीयांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मतभेद होते अशीही चर्चा आहे. पार्थ पवार याच्या उमेदवारी आणि पराभवातून सुनेत्रा पवार ही होत्या नाराज होत्या असं बोललं जातं. राणा जगजितसिंह यांचा भाजप प्रवेश सुनेत्रा आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच झाल्याचीही चर्चा आहे.

SPECIAL REPORT : शरद पवारांना ईडीची 'शिडी' फायद्याची ठरणार का?

अजित पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला असून त्याबाबत पक्षातल्या कुणालाच माहिती नव्हती असंही बोललं जातंय. अजित पवारांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राजीनाम्याचं खरं कारण हे राजकीय असलं पाहिजे असंही म्हटलं आहे.

काँग्रेस उमेदवारांची पाहिली यादी झाली लीक, हे दिग्गज उतरणार आखाड्यात!

या आधीही काही वेळा अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत निर्णय घेतले होते. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पक्षाची बदनामी झाली होती. त्यातच अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या राजकारणामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागतोय असं सांगत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्वच काही अलबेल नसल्याचं उघड झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading