Home /News /mumbai /

पवारांचा निष्ठावंत शिलेदार...राष्ट्रवादीतील दिग्गजांना मागे टाकत गृहमंत्रिपद मिळवलेले अनिल देशमुख कोण आहेत?

पवारांचा निष्ठावंत शिलेदार...राष्ट्रवादीतील दिग्गजांना मागे टाकत गृहमंत्रिपद मिळवलेले अनिल देशमुख कोण आहेत?

राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं गृहमंत्रिपद नक्की कुणाकडे दिलं जाणार, याबाबत मोठी उत्सुकता होती.

    मुंबई, 5 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या खातेवाटपाच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे अखेर कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी असणार, हे आता स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं गृहमंत्रिपद नक्की कुणाकडे दिलं जाणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे दिग्गज स्पर्धेत असताना गृहमंत्रिपदी बाजी मारणारे अनिल देशमुख नेमके कोण आहेत, याबाबत आता राज्यभर चर्चा सुरू आहे. अनिल देशमुख: शरद पवारांचा निष्ठावंत शिलेदार आणि विदर्भातील अनुभवी नेता काटोल मतदारसंघातून 5 वेळा आमदार झालेले अनिल देशमुख हे विदर्भातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी असलेले अनिल देशमुख हे उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे, शेतकरी, बहुजन, सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजू शेट्टी वाढवणार सरकारच्या अडचणी, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारला बोचरा सवाल गृहमंत्रिपद मिळालेले अनिल देशमुख हे 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. सध्या 69 वर्षे वय असलेल्या अनिल देशमुख यांनी याआधीही अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली आहेत. 1995 मध्ये युती सरकारमध्ये ते सांस्कृतिक मंत्री होते. त्यानंतर 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचं राज्यमंत्रिपद, तर त्यानंतर 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, 2009 मध्ये अन्न व नागरी पुरवठा खातं सांभाळलं होतं. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये गृहमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू असताना हे खातं सांभाळण्याची संधी मिळालेल्या अनिल देशमुख यांच्याकडे आता मोठी जबाबदारी असणार आहे. कारण सरकारच्या कामगिरीचं मुल्यमापन करताना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नक्की काय स्थिती आहे, हे प्रामुख्याने विचारत घेतलं जातं. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडून राष्ट्रवादीला सरकार आणि पक्षाची प्रतिमा चांगली ठेवण्याची अपेक्षा असणार आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर 1. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती 2.अजित अनंतराव पवार,उपमुख्यमंत्री- वित्त, नियोजन 3.सुभाष राजाराम देसाई-उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा 4. अशोक शंकरराव चव्हाण- सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) 5. छगन चंद्रकांत भुजबळ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 6.दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील-कामगार, राज्य उत्पादन शुल्क 7.जयंत राजाराम पाटील-जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 8.नवाब मोहम्मद इस्लाम मलिक-अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता 9.अनिल वसंतराव देशमुख- गृह 10. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात- महसूल 11. राजेंद्र भास्करराव शिंगणे-अन्न व औषध प्रशासन 12. राजेश अंकुशराव टोपे-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13.हसन मियालाल मुश्रीफ- ग्रामविकास 14. डॉ.नितीन काशिनाथ राऊत- ऊर्जा 15. वर्षा एकनाथ गायकवाड-शालेय शिक्षण 16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड- गृहनिर्माण 17. एकनाथ संभाजी शिंदे- नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 18. सुनिल छत्रपाल केदार- पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण 19.विजय वडेट्टीवार- इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन 20. अमित विलासराव देशमुख- वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य 21. उदय रविंद्र सामंत- उच्च व तंत्र शिक्षण 22. दादाजी दगडू भुसे- कृषी, माजी सैनिक कल्याण 23. संजय दुलिचंद राठोड- वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 24.गुलाबराव रघुनाथ पाटील- पाणी पुरवठा व स्वच्छता 25. ॲड. के.सी. पाडवी- आदिवासी विकास 26. संदीपानराव आसाराम भुमरे- रोजगार हमी, फलोत्पादन 27. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील- सहकार, पणन 28. अनिल दत्तात्रय परब- परिवहन, संसदीय कार्य 29. अस्लम रमजान अली शेख- वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास 30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे)- महिला व बालविकास 31. शंकराराव यशवंतराव गडाख- मृद व जलसंधारण 32. धनंजय पंडितराव मुंडे- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 33. आदित्य उद्धव ठाकरे- पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार राज्यमंत्री 1. अब्दुल नबी सत्तार- महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य 2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील- गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण 3. शंभुराज शिवाजीराव देसाई- गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन 4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार 5. दत्तात्रय विठोबा भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन 6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम- सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा 7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य 8. संजय बाबुराव बनसोडे- पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य 9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे- नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 10.श्रीमती आदिती सुनिल तटकरे- उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Anil deshmukh, NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या