"सेनेचा सभेत नखरा, वाघाचा झालाय बकरा",जयंत पाटलांचं सेनेवर 'सोनू' साँग

"सेनेचा इथे सभेत नखरा नखरा, वाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी), देवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 08:09 PM IST

मुंबई, 31 जुलै : रेडिओ आरजे मलिष्का हिच्या 'सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?' या गाण्याने आता राज्याच्या विधानसभेतही हास्यकल्लोळ माजवलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी याच सोनू गाण्याचे फक्त शब्द फिरवून शिवसेना आणि भाजपला जोरदार चिमटे काढलेत. त्यांच्या या गाण्याने अख्ख सभागृह हसून हसून लोटपोट झालं.

सेना, तुझा बीजेपीवर भरोसा नाय काय? अशी सुरुवात करत जयंत पाटलांनी सेना-भाजपला चांगलेच शाब्दिक फटकारे मारले.

पाहुयात जयंत पाटलांनी विधानसभेत ऐकवलेलं 'सोनू...'गाणं -

लाचार सत्तेसाठी झोल झोल - झोल झोल

जनतेचा वाजतोय ढोल ढोल - ढोल ढोल

Loading...

देवेंद्र वाघाला फिरवतोय - गोल गोल

सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?

सेनेला दिलाय गाजर गाजर

गाजराचा आकार कसा

लांब लांब - लांब लांब

देवेंद्र, तुझ्या कामास म्हणतो

थांब थांब - थांब थांब

सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?

सेनेचा इथे सभेत नखरा नखरा

वाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी)

देवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल

सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?

देवा, सेनेवर अपमानी घाव खोल खोल - खोल खोल

सत्तेत राहुन त्यांचा शून्य रोल - शून्य रोल

देवेंद्र, कधी तरी खरं बोल - खरं बोल

तुझा सेनेवर भरोसा नाय ना नाय ना?.

सेनेचं भांडं आता खोल खोल - खोल खोल

आता तरी त्यांची साथ सोड - साथ सोड

सत्तेचं नाही काही मोल मोल - मोल मोल

देवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...