Home /News /mumbai /

राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून दोन नावं निश्चित, माजिद मेमन यांचा पत्ता कट?

राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून दोन नावं निश्चित, माजिद मेमन यांचा पत्ता कट?

महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहेत.त्यापैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत.त्यात 2 जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येणार आहेत.

मुंबई, 28 फेब्रुवारी : राज्यसभेवर रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आधीच निश्चित आहे. आता त्यांच्यासोबत असलेले माजीद मेमन यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री फौजिया खान यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहेत.त्यापैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत.त्यात 2 जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येणार आहेत. एप्रिल महिन्यात या सात खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या सातही जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.या दोन जागेवर शरद पवार यांचं नाव निश्चित आहे. मागील वेळी माजीद मेमन यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड करण्यात आली होती. परंतु, यावेळी या जागेवर यावेळी महिलेला संधी दिली जाणार आहे. आघाडी सरकारच्या काळात फौजिया खान यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. तर दुसरीकडे भाजपच्या कोट्यातून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना संधी दिली जाणार आहे. तर दुसऱ्या जागेवर पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, राज्यसभेच्या या दुसऱ्या जागेसाठी साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांचं नाव निश्चित समजलं जात आहे. उदयनराजे यांचं नाव पुढे आल्यामुळे संजय काकडेंनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र, गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करत भाजपला अडचणीत आणलं होतं. त्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमी आहे. असा असणार निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्रातलं राजकीय गणित बदलल्याने त्याचा फटका भाजपला बसणार असून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तर भाजपचे फक्त दोन सदस्य निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26 मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 26 मार्च ला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, NCP, Sanjay kakade, Sharad pawar

पुढील बातम्या