मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Nawab Malik: 'जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का?' समीर खानवरील कारवाईनंतर NCP कडून पहिली प्रतिक्रिया

Nawab Malik: 'जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का?' समीर खानवरील कारवाईनंतर NCP कडून पहिली प्रतिक्रिया

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांचा जावई समीर खान (Samir Khan) याला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर मुंबईतील विविध भागात NCB कडून छापेमारी सुरू आहे.

मुंबई, 14 जानेवारी: जावयाच्या अटकेनंतर NCP नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर NCB ने मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणात आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांचा जावई समीर खान (Samir Khan) याला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर मुंबईतील विविध भागात NCB कडून छापेमारी सुरू आहे. एनसीबीने केलेल्या छापेमारीमध्ये सितारा हॉटेलमधून एका विदेशी नागरिकाला देखील ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण देखील ढवळून निघालं आहे. जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांनी सध्या हा मुद्दा उचलून धरला आहे. मात्र अशावेळी राष्ट्रवादी पूर्णपणे त्यांच्या नेत्याची साथ देत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. 'जावयानं काय केलं याचं खापर सासऱ्यावर का?' दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आधी अशी प्रतिक्रिया दिली की नवाब मलिक यांच्या जावयांना झालेल्या अटकेबाबत त्यांना माहित नाही. पण ते असंही म्हणाले की सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. पुन्हा एकदा त्यांना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, जावयानं काय केलं त्याचं खापर सासऱ्यावर खापर का फोडायचं. नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया जावयाला अटक केल्यामुळे नवाब मलिक अडचणीत आले आहेत. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,' असं नवाब मलिक म्हणाले. समीर खानच्या घरावर छापा एनसीबीच्या टीमने समीर खान (Sameer Khan)च्या वांद्र्यातील घरावर छापा टाकला आहे. करण सजनानी आणि समीर खान यांच्यात ड्रग्ज सप्लायबाबतचं चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे मिळाल्यानंतर एनसीबी ही छापेमारी करत आहे.
First published:

पुढील बातम्या