मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एकनाथ खडसे यांचं ED ला विनंती पत्र, चौकशीसाठी मागितली 14 दिवसांची मुभा

एकनाथ खडसे यांचं ED ला विनंती पत्र, चौकशीसाठी मागितली 14 दिवसांची मुभा

वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. रिपोर्ट अद्याप यायचा आहे.

वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. रिपोर्ट अद्याप यायचा आहे.

वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. रिपोर्ट अद्याप यायचा आहे.

मुंबई, 30 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचालनालयानं ( ED) नोटीस बजावल्यानं खळबळ उडाली आहे. आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, एकनाथ खडसे यांनी EDला विनंती पत्र लिहिलं आहे. कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आल्यानं चौकशीसाठी 14 दिवसांची मुभा मिळावी, असं एकनाथ खडसे यांनी ED ला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. पुण्यातील भोसरीतील (Pune Bhosari Land Issue) भूखंड खरेदी प्रकरणी बुधवारी (30 डिसेंबर) मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) मुंबईतील कार्यालयात उपस्थित होण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे. त्यासाठी मी मुंबईलाही पोहोचले आहे. मात्र, 28 डिसेंबरला आपल्याला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. रिपोर्ट अद्याप यायचा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. याबाबत ED कार्यालयानं 14 दिवसांनंतर चौकशीसाठी हजर होण्याबाबत संमती दिल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. त्याप्रमाणे प्रकृती बरी झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयास पूर्ण सहकार्य करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, एकनाथ खडसे सध्या मुंबईत असून विश्रांती घेत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर आहेत. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील याच भूखंडावरून व्हावं लागलं होतं मंत्रिपदावरून पायउतार एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ED चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाली होती आणि याचं भूखंडावरून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ED नं नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणाची ED चौकशी करणार आहे. म्हणून लागला चौकशीचा ससेमिरा... भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यामागे EDच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज खडसेंनी याआधी व्यक्त केला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या