मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एकनाथ खडसेंनी गर्भित इशारा दिलेली ती CD कुणाची? राजकीय चर्चेला उधाण!

एकनाथ खडसेंनी गर्भित इशारा दिलेली ती CD कुणाची? राजकीय चर्चेला उधाण!

सीडीचा उल्लेख केल्यानंतर खडसे यांनी भुखंडाबाबतही इशारा दिला, माझ्यावर भुखंड खरेदी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र काही दिवस थांबा मी कुणी किती भुखंड घेतले हे सांगतो असंही त्यांनी जाहीर केलं

सीडीचा उल्लेख केल्यानंतर खडसे यांनी भुखंडाबाबतही इशारा दिला, माझ्यावर भुखंड खरेदी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र काही दिवस थांबा मी कुणी किती भुखंड घेतले हे सांगतो असंही त्यांनी जाहीर केलं

सीडीचा उल्लेख केल्यानंतर खडसे यांनी भुखंडाबाबतही इशारा दिला, माझ्यावर भुखंड खरेदी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र काही दिवस थांबा मी कुणी किती भुखंड घेतले हे सांगतो असंही त्यांनी जाहीर केलं

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 23 ऑक्टोबर: भाजपमध्ये अन्याय झाल्याचा पुनरुच्चार करत एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून हातात असलेलं कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात CDचा पुन्हा एकदा उल्लेख केला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं असून ती सीडी नेमकी कुणाची आहे आणि त्यात काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले, भाजप सोडण्यापूर्वी अनेकांनी मला सांगितलं की ते लोक चौकशीचा ससेमीरा लावतील. EDची चौकशी मागे लागेल, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की त्यांनी माझ्या मागे ED लावली तर मी CDलावणार आहे. ही CD लावायची का? असंही त्यांनी व्यासपीठावरूनच कार्यकर्त्यांना विचारलं. या सीडीमध्ये काय आहे हे योग्यवेळी सांगेल असंही त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

एकनाथ खडसे यांनी या आधीही आपल्याकडे भरपूर पुरावे असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता त्या सीडी प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षात अनेक वर्ष घालवल्यामुळे खडसे यांना आरोप कसे करायचे याची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी हा इशारा कुणासाठी दिला याचीही चर्चा सुरू झाली आहे.

BREAKING : 'कुणी किती भूखंड खाल्ले हे आता दाखवून देईन' एकनाथ खडसेंनी केला गजर

या सीडीचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी भुखंडाबाबतही इशारा दिला, माझ्यावर भुखंड खरेदी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र काही दिवस थांबा मी कुणी किती भुखंड घेतले हे सांगतो असंही त्यांनी जाहीर केलं. खडसेंच्या या इशाऱ्यामुळे येणाऱ्या काळात खडसे विरुद्ध भाजप असे चित्र बघायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाले शरद पवार?

खडसेंंच्या पक्षप्रवेशादरम्यान शरद पवारांनी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार असल्याचा मोठा खुलासा यावेळी केला. खडसे राष्ट्रवादीत आले असले तरी त्यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नाही. याशिवाय या पक्षप्रवेशादरम्यान स्वत: एकनाथ खडसे यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजितदादा नाराज आहेत का? पवारांनी दिलं हे उत्तर

खडसेंच्या पक्षप्रवेशानंतरही मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजणं आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल. एकनाथ खडसे यांनी एकदा शब्द दिला म्हणजे तो शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता काहीही काळजीचं कारण नाही. खडसे यांनी जाहीरपणे शब्द दिलेला आहे असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांचं कौतुक केलं.

First published:

Tags: Eknath khadse