कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, ED समोर हजर होणार नाही

कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, ED समोर हजर होणार नाही

एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ED) नोटीस बजावली आहे. पुण्यातील भोसरीतील (Pune Bhosari Land Issue) भूखंड खरेदी प्रकरणी बुधवारी (30 डिसेंबर) मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे मुंबईत दाखल झालेही आहेत. मात्र, ते उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहाणार नसल्याची माहिती समजते. याबाबत एकनाथ खडसे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आल्याची माहिती त्यांनी वकिलामार्फत कोर्टात दिली. त्यामुळे ते ED च्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा...संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांना EDचे नवे समन्स, 'या' दिवशी हजर राहाण्याचे आदेश

एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ED चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाली होती आणि याचं भूखंडावरून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ED नं नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणाची ED चौकशी करणार आहे.

म्हणून लागला चौकशीचा ससेमिरा...

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यामागे EDच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज खडसेंनी याआधी व्यक्त केला होता.

हेही वाचा...हसन मुश्रीफ संतापले, म्हणाले..ग्रामपंचायत निवडणुकीची 'ही' पद्धत लोकशाहीला घातक

'त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 29, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या