धनंजय मुंडे हे पंकजाताईच्या डोक्यात प्रेमाने टपली मारत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. भाषण करत असताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं, कधीतरी ताई अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं. मी, आदित्य ठाकरे बसलो असतो त्यावेळी आदित्य म्हणाले, कदाचित ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या बदलल्या तर बरं होईल असं ते म्हणत होते मी नाही... हा मजेचा भाग सोडून द्या. पण हे खरं आहे. भलेही आम्ही राजकारणात बीड जिल्ह्यात बहीण-भावाचं वैर सर्वांना माहिती आहे. पण काही कुटुंब, काही व्यक्ती त्यांचं मोठेपण इतकं आहे... त्यांच्यासाठी आमचं वैर वगैरे काही नाही. वाचा : ''ताई चष्मा लागू नये, पण...''; पंकजा मुंडेंच्या टोमण्याला आदित्य ठाकरेंचं उत्तर यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं, नेत्रालयाचा उद्घाटन सोहळा असल्याने प्रत्येक गोष्ट दृष्टी आणि लेन्सेससोबत जोडल्या गेल्या पाहिजेत. ज्यांच्या अनुभवाच्या आणि ज्यांच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस कुणाकडेही नसतील असे शरद पवार, सर्वांसोबत चांगले वागणारे असे बाळासाहेब थोरात, एक नवी दृष्टी देण्याची अपेक्षा आहे आणि ज्यांच्या लेन्सेसकडे युवक पाहत आहेत असे आदित्य ठाकरे, आमचे शेजारी जिल्ह्यातील अमित ठाकरे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे बंधू धनंजय मुंडे.. मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठं करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून पाहणअयाचं खूप कमी लोकांना भाग्य लाभलं आहे त्यापैकी आमचे धनंजय मुंडे. काय म्हणाले आदित्य ठाकरे? पंकजा ताई चष्मा लागू नये, पण लागला तर कुठला लागला पाहिजे हे मी सुचवलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, पंकजा ताई तुम्ही मला माझ्या लहानपणीपासून ओळखता. आपण सांगितलं की, चष्मा लागला नाहीय आणि मला माहितीय एकदा चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहितेय. जर लागला तर कुठचा लावावा हेच एवढंच सांगितलं मी त्यांना बाकी पुढचं काही बोललो नाही. काय म्हणाले अमित देशमुख? येथे आल्यावर कळलं की मुंडे बहिण आणि बंधूंचे बरं चाललं आहे, असा चिमटा. अमित देशमुख यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना काढला आहे. आम्हीच बेजार आहोत, पंकजा मुंडे यांचा विचार आला की धनंजय मुंडे यांना काय वाटेल. तुमच्या या घरोब्यात आम्हाला ही सामावून घ्या. हीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.धनंजय मुंडेंनी प्रेमाने पंकजा मुंडेंच्या डोक्यात मारली टपली pic.twitter.com/kElqTRnLpe
— News18Lokmat (@News18lokmat) May 18, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.