दोन मंत्री अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या, लवकरच मोठी घोषणा?

दोन मंत्री अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या, लवकरच मोठी घोषणा?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री अडचणीत आल्यानंतर पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री अडचणीत आल्यानंतर पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे यशवंतराव चव्हाण सभागृहात आले आहेत. तर धनंजय मुंडे चित्रकूट बंगल्यावर आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आले आहेत. दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (J)ayant Patil हे 12 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात येतील आणि अधिकृत बोलतील.

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत आणि या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. तसंच त्यांच्यावर एक महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, त्यामुळे भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.

जावयाला अटक केल्यामुळे नवाब मलिक अडचणीत आले आहेत. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,' असं नवाब मलिक म्हणाले.

Published by: Shreyas
First published: January 14, 2021, 11:35 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading