'नवीमुंबई पालिका' आता महाविकासआघाडीच्या रडारवर, सेनेनं आखला प्लॅन!

'नवीमुंबई पालिका' आता महाविकासआघाडीच्या रडारवर, सेनेनं आखला प्लॅन!

राज्याची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आता नवी मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी नवी मुंबई, 07 डिसेंबर : राज्याची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आता नवी मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली आहे. मागील अनेक वर्षापासूनच शिवसेनेचे स्वप्न पूर्ण कारण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. त्याला कारण ही तसेच आहेत.बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले माजी मंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेला रामराम केल्यानंतर शरद पवारांच्या विश्वासातले मानले गेले. मोदींच्या लाटेत ही नाईकांनी महापालिकेची सत्ता अबाधित ठेऊन राष्ट्रवादीची इज्जत शाबूत ठेवली. मात्र, नाईकांनी भाजप प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली शेवटची महापालिका ही निसटली.तर दुसरीकडे नाईकांच्या बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त करण्यासाठी शिवसेनेने खतपाणी घातल्याने नाईकांनी माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने त्या कार्यक्रमाला न जाणं पसंद केलं. इथेच माशी शिंकली आणि नाईकांची बेलापूरची उमेदवारी कापली गेली. आता कोणत्या ही परिस्थितीत नाईकांची सत्ता खालसा करण्यासाठी महाविकास आघाडीची यंत्रणा कामाला लागली आहे.

मोदींच्या लाटेत पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या राष्ट्रवादीच्या महापालिका वाहून गेल्या मात्र नाईकांनी आपली महापालिकेत एक हाती सत्ता आणली. हे सर्व शक्य केलेल्या विकास कामांमुळेच झालं असल्याचं सत्ताधाऱ्यांच म्हणणं आहे.सध्या नाईकांना कधी नव्हे एवढा भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, राज्याचं राजकारणातलं चित्र बदल्यामुळे अनेक नेते परतीच्या वाटेवर आहे. आता नवी मुंबईत काय राजकीय नाट्य घडतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 07:29 AM IST

ताज्या बातम्या