संयमाचा बांध फुटला... राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले

संयमाचा बांध फुटला... राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले

श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना बेदम चोप देण्यात आला आहे. जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी भररस्त्यावर नरेंद्र भुसाणे यांना बेदम मारहाण केली.

  • Share this:

मोहन जाधव,(प्रतिनिधी)

रायगड, 19 सप्टेंबर: श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना बेदम चोप देण्यात आला आहे. जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी भररस्त्यावर नरेंद्र भुसाणे यांना बेदम मारहाण केली. भुसाणे हे जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहे. पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुरुवारी ठेवीदारांनी भुसाणे यांना घेराव घालून त्यांना बेदम मारहाण केली.

ठेवीदार असे झाले आक्रमक...

पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने नरेंद्र भुसाने यांना मारहाण करण्यात आली. कष्टाने कमावलेला पैसा मागील कित्येक महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत. सध्या या प्रकरणावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे दिले जातील, अशी नोटीस पतसंस्थेच्या कार्यालयावर लावण्यात आली होती. पतसंस्थेच्या संचालकांकडून 19 तारखेपर्यंत सर्व ठेवीदारांना पैसे परत केले जातील, असे सांगण्यात आले होते. अखेर गुरुवारी सकाळपासून बँकेच्या ठेवीदारांनी पैशाच्या परताव्यासाठी पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. पतसंस्थेकडून पैसे परत मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठेवीदार आक्रमक झाले आणि त्यांनी पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी परिस्थिती हाताळत ठेवीदारांना काही वेळेसाठी शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व ठेवीदारांनी आपला रोख श्रीवर्धन पोलिस ठाण्याकडे वळवला आणि पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि संचालकांवर गुन्हा दाखल करा आणि आमचे पैसे व इतर ठेवी परत करा, अशी मागणी ठेवीदारांनी केली.

VIDEO:ठेवीदार भडकले, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले

First published: September 19, 2019, 8:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading