मुंबई, 27 मे: कोरोनाची (Corona) दोन हात करत असताना महाविकास आघाडीमध्ये (MVA Government) आता बिघाडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या कामाच्या पद्धतीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी 'राज्याचे आपण प्रमुख आहात', असं सांगत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
IPL साठी T20 'या' देशातही होणार T20 वर्ल्ड कप, ICC ची खास योजना
मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार भेटी आधी काही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पवार यांनी चर्चा केली होती. त्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती समजते. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रिमंडळ प्रमुख या नात्याने त्यांची जबाबदारी समन्वयाची असल्याचे सांगत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
मागील काही दिवसांत वेगवेगळ्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते हे नाराज आहेत. नेमका हाच मु्ददा पवार यांनी भेटीत बोलून दाखवल्याचे समजते.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांना सिल्वर ओके या निवास्थानी बोलवून घेतले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांनी शरद पवारांसोबत चर्चा करून बाहेर पडले आहे.
आईच्या मृत्यूनंतरही कर्तव्यात कसूर नाहीच, रुग्णवाहिका चालकाचं होतंय कौतुक
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसचे मंत्री पदोन्नती आरक्षण अध्यादेश यावर आक्रमक भूमिका घेतील. त्यावेळेस काय नेमकी भूमिका घ्यायची याची चर्चा पवार यांनी आपल्या मंत्र्यांसोबत केल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad pawar, Uddhav thackeray