माणसाने आशा ठेवायला पाहिजे, शरद पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला

'सत्ता गेल्या नंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही'

'सत्ता गेल्या नंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही'

  • Share this:
    मुंबई, 25 नोव्हेंबर : 'सत्ता गेल्याच्या नंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्द वापरत असतील. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सणसणीत टोला लगावला आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर पत्रकार परिषद शरद पवार यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. कंगनाला HCकडून दिलासा; राजद्रोहाच्या तक्रारीविरोधात अभिनेत्रीची अटक टळली 'हे सरकार बेईमानीने आले आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, असा सवाल विचारला असता पवार म्हणाले की, 'सत्ता गेल्या नंतर त्रास होत असतो.  ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे.' तसंच, 'साहजिक माणसाने काही आशा, अपेक्षा ठेवावी. त्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यांनी मागेही सांगितले होते 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', पण त्यामुळे कालही ते असंच काही बोलले होते. पण, ठीक आहे, लोकं त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतात. ती अतिभावना असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे, हे लोकांच्या अधिक लक्षात येईल, असं टोलाही पवारांनी लगावला. Birthday Special: मोठ्या पडद्यावरील 'आम आदमी'चा चेहरा, हे आहेत 5 बेस्ट चित्रपट रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असं भाकीत वर्तवलं होतं, यादबद्दल शरद पवार यांना विचारले असता पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. 'रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे.  पण ठीक आहे. त्यांचा हा गूण मला माहिती नव्हता. खेड्यापाड्यातून आलेला नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसं जर सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही' असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला. धक्कादायक! संतापलेल्या शेतकऱ्यांनं शासकीय कार्यालयातच स्वत: ला घेतलं पेटवून 'दिल्लीत वेगळं राज्य असेल तर राज्य चालवणं कठीण असतं. लोकांची कामं करत असताना मदत करण्याऐवजी‌ केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज‌ पाहण्यास मिळाले आहे. दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, आज हे बघायला मिळेल' असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवरून केंद्र सरकारवर टीका केली.
    Published by:sachin Salve
    First published: