Home /News /mumbai /

राज ठाकरे यांच्या फोन कॉलवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे यांच्या फोन कॉलवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे यांनीही राज्यपालांच्या शब्दाला मान देत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली.

मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्यपालांच्या  (governor bhagat singh koshyari)  भेटीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackery) यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. शरद पवार यांनीही 'राज यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून भेटीबद्दल मात्र काहीही ठरले नाही', असं स्पष्ट केले आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद पेटलेला आहे. याच दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, ही भेट वाढीव वीज बिल  आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असल्याचे राज यांनी स्पष्ट केले. पण, त्याचवेळी राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, बीएमसीच्या अधिकाऱ्यावर गर्दुल्यांनं उगारला कोयता राज ठाकरे यांनीही राज्यपालांच्या शब्दाला मान देत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली. राज यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी खुलासा केला आहे. 'राज यांचा मला फोन आला होता. आमच्यात भेटण्याबद्दल काही ठरलं नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. त्यामुळे भेटीचं असं काही नियोजन ठरले नाही. मला फक्त राज ठाकरे यांनी सांगितलं की, मला राज्यपालांनी तुमच्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे' असं शरद पवारांनी सांगितले. उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार? काय म्हणाले संजय राऊत
राज्यपालांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि वीज बिलाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शरद पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' पत्रामुळे नाराज असल्याचे राज्यपालांनी एकाप्रकारे सांगून टाकले. त्यामुळे आगामी काळात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष कायम राहणार याचे चिन्ह कायम आहे. काय आहे राज ठाकरे यांच्या मागण्या? 'लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. आमच्या नेत्यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम परत करायला हवी, अशी पहिली मागणी राज ठाकरे यांनी केली. तसंच, 'दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी लक्ष्य वेधलं. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे', अशी मागणीही राज यांनी केली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या