मुंबई, 14 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांना ऊत आला होता. पण, 'राष्ट्रपतिपदाची निवडणूक (presidential election) लढवण्याबाबतची बातमी पूर्णपणे असत्य आहे' असं म्हणत खुद्द शरद पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाली होती आणि यासाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाव समोर आलं होतं. या संपूर्ण घडामोडीवर अखेर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
सुवर्णसंधी! बुलढाणा डाक विभागात 'या' पदासाठी जागा रिक्त; आता लगेचच पाठवा अर्ज
'राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याबाबतची बातमी पूर्णपणे असत्य आहे. 2024 ची निवडणुकीचे तिसरी आघाडी नेतृत्व किंवा राष्ट्रपतिपद निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या भेटीतही अशी कोणतीही चर्चा झाली नाही' असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
तसंच, 'भाजपचे संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता अशी कोणतीही शक्यता नाही, असंही पवारांनी सांगितलं.
सुंदर पिचईंचं गली क्रिकेट, गुगलीवर Google च्या सीईओंची बॅटिंग!
'काँग्रेसने स्वबळाचा नारा देत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे का? असं विचारलं असता, 'असा काही त्यांचा निर्णय झाला हे अद्याप माहिती नाही. नाना पटोले यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. प्रत्येक पक्षाला आपली संघटना बळकट करण्याचा आणि विस्तार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याबद्दल आमच्यात कोणतीही नाराजी नाही, असंही पवार म्हणाले.
'राज्यातल्या महामंडळ वाटपाबाबत विषयावर चर्चा झाली आहे. 95 टक्के महामंडळ वाटपावर सहमती झाली आहे. 3-4 महामंडळ वाटपाबाबत चर्चा सुरू आहे, कालच्या भेटीत काँग्रेसचा आग्रह होता की, 95 टक्के महामंडळ वाटप करावं, असंही पवार म्हणाले.
दरम्यान, 'शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ही बातमी निराधार आहे. आजच्या घडीला राष्ट्रपतिपदाची निवडणूक नाही. पक्षाअंतर्गत किंवा कोणत्याही नेत्याशी तशी चर्चा झाली नाही, असं मलिक म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.