IAS अधिकारी निधी चौधरींवर कारवाई करा, पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

IAS अधिकारी निधी चौधरींवर कारवाई करा, पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलेल्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जून: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलेल्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मे ला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्वीट केले होते. महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले. त्यांनी लिहीलं, "महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक्यू गोडसे."

मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत, असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्‍याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे देखील वाचा- 'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त ट्वीट

निधी चौधरी यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. टीका सुरु झाल्यानंतर चौधरी यांनी आपलं ट्वीट डिलिट केले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी गांधींजींच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करत, लोकांनी माझ्या ट्वीटचा विपर्यास केला त्यामुळे मी माझे ट्वीट डिलिट केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. महात्मा गांधींचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता असेही त्यांनी नव्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

SPECIAL REPORT : विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तो खोल विहिरीत उतरला, पुढे काय घडलं?

First published: June 2, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading