मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला, तो वादग्रस्त ठरला मात्र...पवारांनी व्यक्त केली भावना

पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला, तो वादग्रस्त ठरला मात्र...पवारांनी व्यक्त केली भावना

Sharad Pawar

Sharad Pawar

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • Published by:  Dhanshri Otari
मुंबई, 15 नोव्हेंबर: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचं आज वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, यासोबत त्यांनी यावेळी पुरंदरे यांच्या वादग्रस्त विषयाला हात घातला. पवार म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी काळजी घेतली असे योगदान देणारे पुरंदरे आता आपल्यात नाहीत. त्यात एका गोष्टीचं समाधान म्हणता येणार नाही पण ते दीर्घायुषी होते. त्यांना लोकांच्या सदिच्छा मिळाल्या असे मला वाटते. ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचं अनेकांच्या मनात दुःख आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्तसुद्धा मुद्दे होते. पण त्यासंबंधीचं भाष्य करण्यासाठी मी जाणकार नाही. कुणीही काहीही मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा लोक काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान विसरता येणार नाही. त्यांचं कार्य पुढे कसं सुरू रहावं, यावर मी भाष्य करणार नाही. यात वेगवेगळी मतं आहेत. मला यात पडायचं नाही. अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांचं निधन झालं आहे. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
First published:

Tags: NCP, Sharad pawar

पुढील बातम्या