मुंबई, 26 मे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एक बैठक झाली आहे. शरद पवार हे सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी (Varsha Bungalow) दाखल झाले. त्यानंतर शरद पवार आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 40 मिनिटे बैठक झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. गेले काही दिवस आजारी असलेले शरद पवार यांनी आज खूप दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली यासंदर्भात अधिक माहिती मिळालेली नाहीये. मात्र, या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडी तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कोविड 19 संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपला मोठं खिंडार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 नगरसेवकांच्या हाती शिवबंधन
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळपास 40 मिनिटे बैठक झाली. सायंकाळी 5.30 ते 6.10 वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.
बैठकीच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मराठा समाजाला विश्वासात कसं घ्यायचं या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
जळगावमधील मुक्ताईनगरमधील नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. 17 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक हे शिवसेनेत आल्याने आता भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. हे नगरसेवक एकनाथ खडसे यांना मानणारे होते. नगरसेवक हे त्यांच्या गटाचे होते पण ते राष्ट्रवादीमध्ये जातील वाटलं होतं पण ते शिवसेनेत आले. यामुळे आता मुक्ताई नगरपालिकेत सत्तांतर होणार हे निश्चित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.