मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शरद पवारांकडून पुन्हा चकवा? देशाच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या बातमीचं केलं खंडन

शरद पवारांकडून पुन्हा चकवा? देशाच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या बातमीचं केलं खंडन

यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांची वर्णी लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या चर्चेचं स्वत: शरद पवार यांनी खंडन केलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 10 डिसेंबर : देशाच्या राजकारणात आज दिवसभर एका बातमीने खळबळ उडवून दिली आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया (Sonia Gandhi) गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील, असं सांगितलं जात आहे. तसंच या अध्यक्षपदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांची वर्णी लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या चर्चेचं स्वत: शरद पवार यांनी खंडन केलं आहे.

यूपीए प्रमुख म्हणून माझी निवड होणार, या बातमीत तथ्य नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. याबाबत 'एबीपी माझा'नं वृत्त दिलं आहे.

'शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशा आशयाचं निराधार वृत्त माध्यमांकडून देण्यात येत आहे. अशा प्रस्तावाबाबत यूपीएतील घटकपक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही,' असा दावा राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आला आहे. तसंच देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी माध्यमांमध्ये अशा बातम्या पेरल्या जात असाव्यात, असा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

अजित पवारांनी काय दिलं होतं स्पष्टीकरण?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केंद्रीय पातळीवर सुरू असलेल्या चर्चेबद्दल राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'पवार साहेब दिल्लीत गेले की अशा बातम्या येतात. साहेब मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांशी सबंध आले होते. आता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अजून तर माझ्या कानावर काही नाही. उद्या पवार साहेब यांचा वाढदिवस आहे तो शांततेत करण्याचा प्रयत्न आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चेबाबत स्पष्ट संकेत देणं टाळलं आहे.

First published:

Tags: Sharad pawar, Sonia gandhi