Home /News /mumbai /

सज्ज राहा... या शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आवाहन

सज्ज राहा... या शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आवाहन

'निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे. आपण प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे राहावे

    मुंबई, 3 जून: 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला आहे. आपण प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ 90 ते 120 च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. हेही वाचा...मोठी बातमी! 'निसर्ग' वादळानं घेतलं रौद्र रूप, कोकणाच्या उंबरठ्यावर पोहोचलं वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, 'निसर्ग' चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं आहे. आता कुठल्याही क्षणी ते किनारपट्टीवर धडकेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते 50 किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. आता ते मुरुडला धडकणार आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीवर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली परिसरात चक्रीवादळाचा फटका बसायला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे. हेही वाचा.. 'नमस्ते ट्रम्प'मुळे देशात पसरला कोरोना, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इगतपुरी, नाशिक,चांदवड, मालेगाव असा निसर्ग चक्रीवादळाचा वेग असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या