Home /News /mumbai /

शरद पवार, अजितदादा पोहोचले संजय राऊत यांच्या घरी, भेटीचा VIDEO

शरद पवार, अजितदादा पोहोचले संजय राऊत यांच्या घरी, भेटीचा VIDEO

संजय राऊत यांच्यावर 3 डिसेंबर रोजी लीलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery) करण्यात आली होती.

    मुंबई, 06 डिसेंबर :  शिवसेना खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery) करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी संजय राऊत यांच्या निवास्थानी जाऊन तब्येतीची विचारपुस केली. यावेळी गायक आनंद शिंदे हे सुद्धा उपस्थितीत होते.  संजय राऊत यांच्यावर 3 डिसेंबर रोजी लीलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery) करण्यात आली होती. तब्बल सव्वा तास ही सर्जरी चालली होती.  संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी राऊत यांना काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर ही दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली. छातीत पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर गुरूवारी दुपारी त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Leelavati Hospital mumbai) दाखल करण्यात आलं होतं. हृदयरोग तज्ज्ञ डॉ.मॅथ्यू आणि डॉ.अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चंद्रावरची धूळही खरेदी करणार नासा, 15000 डॉलर्स किंमत देण्यासाठी तयार दरम्यान, संजय राऊत यांच्यावर हृदयात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आणखी स्टेन टाकावे लागतील असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. एप्रिल महिन्यात डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी वेळ दिली होती. पण, मुंबईत कोरोनाचा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संजय राऊत यांच्यावर होणारी सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती. मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन कालवश संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी गेले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, घरी आल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या