नागपूरमध्ये पराभव झाल्याने भाजपमधीलच एक गट खूश, अजित पवारांनी ठेवलं दुखऱ्या नसेवर बोट

पदवीधर लोकांनी पराभव केला हे भाजपच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला.

पदवीधर लोकांनी पराभव केला हे भाजपच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला.

  • Share this:
मुंबई, 15 डिसेंबर : हिवाळी अधिवेशानादरम्यान विधानसभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भाजपच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला. 'तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने त्यांना दुःख झालं. हे सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल, पण ते गेलं नाही, वर्षात जाईल म्हणाले, पण तरीही गेलं नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते आमच्या पाच जागा येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल. पण निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबलं आहे. नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत,' असं म्हणत अजित पवार यांनी भाजपमधल्या कथित गटबाजीवर बोट ठेवलं आहे. 'पुण्यात चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते, पण आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. तीच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना भाजपने तिथं घेतल्याने आली. अमरावतीला चुकलं, पण एक समाधान आहे तिथं भाजपचा आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग... याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिलं आहे. आता मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,' असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला. अजित पवार यांच्या भाषणातील मोठे मुद्दे : - महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण प्रश्न, ओबीसींचे प्रश्न असतील, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही - कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही - ड्रेसकोडबाबत सरकार फेरविचार करतंय, जे योग्य आहे ते केलं जाईल - काल बातम्या सुरू होत्या 90 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च - हे सरकार आल्यावर खर्च झालाय 17 कोटी 18 लाख - हा खर्च मंत्र्यांचे बंगले, सदनिका, विधानसभा, मंत्रालय, उच्च न्यायालय इमारती, सत्र न्यायालय इमारती, दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालये, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय. त्या 90 कोटीत अंदाजे 20 कोटीची मागच्या सरकारची थकीत बिलं आहेत - आमच्या काळात 17 कोटी खर्च झालाय - वर्षा बंगल्याचं एक रुपयाही थकीत बिल नाही, तशीच स्थिती देवगिरी बंगल्याची - बातम्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही
Published by:Akshay Shitole
First published: