Home /News /mumbai /

आमचा मुख्यमंत्री अजून झाला नाही पण..,राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे सूचक विधान

आमचा मुख्यमंत्री अजून झाला नाही पण..,राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे सूचक विधान

' शरद पवारांच्या पक्षाला फोडण्याचे, तोडण्याचे, त्याचे लचके तोडण्याचे अनेक प्रयत्न भाजपाने केले. पण सर्वसामान्यांनी ते यश अपयशात बदललं'

मुंबई, 10 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 21 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी पक्षच्या वाढीबद्दल अत्यंत सूचक विधान केले आहे. 'आतापर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे, जर अशी अपेक्षा केली नाहीतर पक्ष कसा पुढे जाईल' असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना जयंत पाटलांनी भाजपवर सडकून टीका केली. हेही वाचा -घरात वाहिला रक्ताचा पाट, चुलत भावानेच केली भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या 'गेल्या 21 वर्षात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तारला आहे. अनेक संकटांमधून पक्ष तावून सुलाखून निघालेला आहे. शरद पवारांच्या पक्षाला फोडण्याचे, तोडण्याचे, त्याचे लचके तोडण्याचे अनेक प्रयत्न भाजपाने केले. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालं. पण सर्वसामान्यांनी ते यश अपयशात बदललं. लोकांना दलबदलू नेते आवडत नाहीत हेच यावरुन लक्षात आलं आहे. घाऊक प्रमाणात पक्षप्रवेशाचा भाजपच्या प्रयत्नांचा लोकांनी निषेध केला, अशी टोला जयंत पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री अजून झाला नाही तो झाला पाहिजे या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरही जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जयंत पाटील म्हणाले की, 'प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी भावना असू शकते. प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते, ती कार्यकर्त्यांनी बाळगली नाही तर पक्ष तरी कसा पुढे जाणार?' हेही वाचा -पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार पार, तरीही नवी आकडेवारी दिलासादायक! 'कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा बोलून दाखवली. एक पक्ष म्हणून अशा अपेक्षा बाळगणे मला काही चुकीचं वाटत नाही', असंही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं. शरद पवारांचा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना टोला दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.   'दोन दशकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष अनेक चढ-उतार पाहिले. सत्ता असताना आणि सत्ता नसताना हा कार्यक्रम देखील पाहिला अनेक नेत्यांना भरभरून दिलं. पण स्वतः च्या सत्तेसाठी, संस्थांसाठी पक्ष सोडून गेले तरी देखील त्याचा परिणाम पक्षावर झाला नाही. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. हेच सिद्ध झालं, असं म्हणत पवारांनी ज्यांनी पक्ष सोडून गेले. त्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत टीका केली. हेही वाचा -झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांमुळे हा पक्ष कधीच संपला नाही, असं पवारांनी आवर्जून नमूद केले.  त्याच वेळी राज्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वित्त मंत्री अजित पवार, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यांचे कौतुक पवारांनी केले आहे. हे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे आहेत याचा अधिक अभिमान असल्याचे देखील पवार यांनी आवर्जून म्हटले. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP

पुढील बातम्या