Home /News /mumbai /

कोविड सेंटरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना, कार्यवाहीसाठी आरोग्य विभागाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कोविड सेंटरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना, कार्यवाहीसाठी आरोग्य विभागाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

अशा घटनांबाबत संताप व्यक्त केला जात असतानाच राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 29 सप्टेंबर : कोरोना व्हायरससारख्या भयंकर संकटाला तोंड देत असताना राज्यात काही धक्कादायक घटना समोर आल्या. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये लैंगिक अत्याचार होत असल्याच्या काही घटना घडल्या. अशा घटनांबाबत संताप व्यक्त केला जात असतानाच राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात कोविड सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाने रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचना कोविड केअर सेंटर्स, कोविड हेल्थ केअर सेंटर्स, डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल, जम्बो कोविड सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर्समध्ये अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास पीडित व्यक्तीची तपासणी त्या सेंटरमध्येच करावी. त्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ (स्त्री वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी) जवळच्या शासकीय अथवा निमशासकीय रुग्णालयातून उपलब्ध करुन घ्यावे. त्यासाठी लागणारा तपासणी कक्ष कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात यावा. कोविड प्रोटोकॉलनुसार पीपीई कीट वापरून पीडिताची वैद्यकीय तपासणी करावी. पीडित व्यक्तीला कोवीड सेंटरमध्येच कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, पोलिस मदत उपलब्ध करून द्यावी. या मार्गदर्शक सूचनांची राज्यभर अंमलबजाणी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Sexual harassment

    पुढील बातम्या