• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; चौकशीसाठी दिल्लीची टीम मुंबईला येणार

Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; चौकशीसाठी दिल्लीची टीम मुंबईला येणार

आर्यन खान अटक (Aryan khan arrest) प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB zonal director sameer wankhede) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. आर्यन खानला अटक (Aryan khan arrest) केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB zonal director sameer wankhede) यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा देखील त्यांच्यावर आरोप (allegations of corruption) झाला आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर वेळोवेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच टीव्ही माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा आरोपी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या एनसीबीचं दिल्लीतील एक पथक मुंबईला येणार आहे. हा पथकात  NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह अन्य दोन इन्स्पेक्टर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. हेही वाचा-2006 ला पहिलं लग्न, 10 वर्षांनी घटस्फोट; समीर वानखेडेंचं आरोपांवर तात्काळ उत्तर याबाबत माहिती देताना ज्ञानेश्वर सिंग यांनी म्हटलं की, 'NCBच्या महासंचालकांना यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांनी या प्रकरणी NCBच्या अंतर्गत दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल. ही चौकशी नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे यावर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही,' असं म्हटलं आहे. हेही वाचा-''प्रभाकर साहिलच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही'', संजय राऊत आक्रमक दुसरीकडे, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी कोर्टात एका प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यामध्ये त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: