Home /News /mumbai /

नवाब मलिकांच्या आरोपावर NCB चं स्पष्टीकरण, तीन नाहीतर 6 जणांना पुराव्या अभावी दिलं सोडून

नवाब मलिकांच्या आरोपावर NCB चं स्पष्टीकरण, तीन नाहीतर 6 जणांना पुराव्या अभावी दिलं सोडून

एनसीबीनं ही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच NCB चे एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे.

मुंबई, 09 ऑक्टोबर:  मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने (NCB) धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी (Nawab Malik) गंभीर आरोप केलेत. काही वेळांपूर्वीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलं. त्यानंतर एनसीबीनं ही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच NCB चे एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे. एनसीबीची पत्रकार परिषद एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं  गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.  तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरु आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे. हेही वाचा- IPL 2021: फक्त 1 मॅच खेळूनही केला मोठा रेकॉर्ड, सर्व भारतीयांना टाकलं मागं  NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत असल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. तसंच मुंबई NCB टीम ने मोठी कारवाई केलीय. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यांत 8 जणांना अटक करण्यात आली. 9 साक्षीदार होते. अटक करण्यात आलेल्या लोकांना  NCB कधीच ओळखत नव्हती. 2 तारखे आधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हती,  असं एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे.तसंच आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते, असंही एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.  कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एनसीबीनं पत्रकार परिषदेत दिली आहे. सगळ्या प्रक्रिया कायदेशीर रित्या पार पाडल्या गेल्या. तपासात आढळलेल्या पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपींना NCB कोठडी सुनावली होती.  विविध प्रकारचे अंमली पदार्थ सापडले होते. NCB वर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही एनसीबीनं म्हटलं आहे. कारवाई दरम्यान तात्काळ साक्षीदार तयार करावे लागतात, अशी माहितीही एनसीबीनं दिली आहे. हेही वाचा- खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं: उद्धव ठाकरे किरण गोसावी यानं जे सांगितलं तेच आम्ही नोंदवलं. NCB जात धर्म आणि भाषेनुसार काम करत नाही. आम्ही पुराव्या आधारावर बोलतो, असंही म्हटलं आहे. आम्हाला जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार असल्याचंही एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे. नवाब मलिकांचे आरोप एनसीबीनं 8 लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासात सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव reflect झालं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला.  या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे ncb ला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करयोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असं मलिक म्हणालेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nawab malik, NCB, NCP

पुढील बातम्या