Home /News /mumbai /

BREAKING : NCB पोहोचली शाहरुख खानच्या घराजवळ, आर्यनच्या ड्रायव्हरला बोलावले चौकशीला!

BREAKING : NCB पोहोचली शाहरुख खानच्या घराजवळ, आर्यनच्या ड्रायव्हरला बोलावले चौकशीला!

आर्यन खानला अटक केल्यानंतर आता NCB ने आता ड्रायव्हरला समन्स बजावला असून चौकशी करता हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

आर्यन खानला अटक केल्यानंतर आता NCB ने आता ड्रायव्हरला समन्स बजावला असून चौकशी करता हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

आर्यन खानला अटक केल्यानंतर आता NCB ने आता ड्रायव्हरला समन्स बजावला असून चौकशी करता हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

  मुंबई, 09 ऑक्टोबर : Cordelia  क्रुझवर ड्रग्स पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या (sharukh khan) मुलाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर केंद्रीय अंमलीविरोधी पथक अर्थात एनसीबीच्या (NCB) कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पण, दुसरीकडे एनसीबीने आपल्या कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. आता आर्यनच्या (aryan khan) ड्रायव्हरला चौकशीसाठी समन्स बजावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने  आर्यन खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवला आहे. चौकशी करता हजर राहण्याची सूचना या समन्समधून देण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनच्या ड्रायव्हरला उद्या चौकशीला हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीनं ही पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच NCB चे एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे. दुधासोबत जिलेबी खाताय? जाणून घ्या चकित करणारे फायदे एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं  गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.  तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरू आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे. NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत असल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. तसंच मुंबई NCB टीम ने मोठी कारवाई केलीय. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यांत 8 जणांना अटक करण्यात आली. 9 साक्षीदार होते. अटक करण्यात आलेल्या लोकांना  NCB कधीच ओळखत नव्हती. 2 तारखे आधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हती,  असं एनसीबीनं स्पष्टपणे सांगितलं आहे.

  एका Commentमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्याची हत्या; कॉलेज परिसरातच घातली गोळी

  तसंच, आरोपींना घेऊन जाण्यास मनिष भानूशाली यांना कोणीही आदेश दिले नव्हते, असंही एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.  कॅमेऱ्याची गर्दी होती म्हणून त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती एनसीबीनं पत्रकार परिषदेत दिली आहे. काय आहे नवाब मलिकांचे आरोप एनसीबीनं 8 लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे. रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासांत सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव reflect झालं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला.  या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे ncb ला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारला.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Aryan khan, Mumbai, NCB

  पुढील बातम्या