Home /News /mumbai /

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, जात पडताळणी समितीकडून होऊ शकते चौकशी!

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, जात पडताळणी समितीकडून होऊ शकते चौकशी!

पुढील सुनावणी ही 14 डिसेंबरला होणार आहे. या समितीने कागदपत्रे पाहून चौकशीचे करण्याचे संकेत दिले आहे.

पुढील सुनावणी ही 14 डिसेंबरला होणार आहे. या समितीने कागदपत्रे पाहून चौकशीचे करण्याचे संकेत दिले आहे.

पुढील सुनावणी ही 14 डिसेंबरला होणार आहे. या समितीने कागदपत्रे पाहून चौकशीचे करण्याचे संकेत दिले आहे.

  मुंबई, 30 नोव्हेंबर : मुंबई ड्रग्स क्रुझ पार्टी प्रकरणामुळे वादात सापडलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी वानखेडेंना जातपडताळणी समितीसमोर  (caste verification committee) हजर व्हावे लागणार आहे. 'समीर वानखेडे हे भ्रष्ट अधिकारी आहे. वानखेडे हे मागसवर्गीय नाही. त्यांनी बनावट कागदपत्र दाखवून जागा बळकावली आहे, असा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे  यांनी केला होता. या प्रकरणी आज महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने कागदपत्र घेऊन कार्यालयात बोलावले होते. पण अशोक कांबळे यांच्या वकिलांनी कागदपत्र दाखल केली आहे. या कागदपत्रांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे समितीने तक्रारदार आणि समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. पुढील सुनावणी ही १४ डिसेंबरला होणार आहे. या समितीने कागदपत्रे पाहून चौकशीचे करण्याचे संकेत दिले आहे. जर समीर वानखेडे यांची कागदपत्र खोटी ठरली तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. काकीवरील प्रेमासाठी पत्नीची केली हत्या; अनैतिक संबंधाचा भयावह शेवट विशेष म्हणजे, समीर वानखेडे यांच्यावर जातीच्या दाखल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयात हजर राहून आपल्याकडे असलेली सर्व कागदपत्र दाखवली होती. आयोगाकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

  'लग्न कधी करणार ?' यावर अंकिता लोखंडेची अशी होती प्रतिक्रिया, video viral

  तर, समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली आहे. एका होतकरू तरुणाची नोकरी समीर वानखेडेंनी हिरावली आहे. धर्मावरुन राजकारण करण्याचा माझा हेतू नाही. समीर वानखेडे याने बनावट जात प्रमणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी केला होता.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या