मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (mumbai cruise drug case) सुपरस्टार शाहरुख खान (sharukh khan) याचा मुलगा आर्यन खानला अटक (Aryan Khan arrest case) करणे अंमली विरोधी पथक अर्थात एनसीबीचे (ncb) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांना चांगलेच भोवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपांना सामना करणाऱ्या एनसीबीने अखेर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची या प्रकरणातून गच्छंती केली आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहे. ( Sameer Wankhede removed from Aryan Khan case )
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने एसआयटी स्थापन केली आहे. मुंबईतील प्रकरणं सेंट्रल युनिटकडे हलवण्यात आली आहे. आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना बाजूला करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खानच्या चौकशीतून हटवण्यात आले असून या प्रकरणाचा आता दिल्लीची टीम तपास करणार आहे.
गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात 2 ठिकाणी बैलगाडा शर्यत, भि..र्रर्रर्र थराराचा VIDEO
या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशात डीजी एनसीबीने एनसीबी मुंबई झोनल युनिटमधून 5 प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत.
अरमान खान आणि आर्यन खान सारखी ही काही बॉलिवूड प्रकरणे आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंह या प्रकरणाचा तपास पाहणार आहे. संजय सिंग एनसीबीमध्ये डीडीजी ऑपरेशन्स आहेत. ही संवेदनशील प्रकरणे हलवण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण नव्याने तपास पुराव्यानिशी केला जाणार असल्याची माहितीसमोर आली आहे.
पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट
सेंट्रल युनिट मॉनिटरिंगमुळे आर्यन खानसारख्या हायप्रोफाईल प्रकरणांबद्दलचा अनावश्यक वाद टाळता येईल, अशी भूमिका एनसीबीने घेतली आहे. या प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा टेकओव्हर चौकशीसाठी संजय सिंह उद्या टीमसह मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.