दाऊदच्या ड्रग कारखान्याचा खेळ खल्लास! मुंबई NCB ची मोठी कारवाई

दाऊदच्या ड्रग कारखान्याचा खेळ खल्लास! मुंबई NCB ची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने (NCB) धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बुधवारी बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केली असता NCB च्या हाती ड्रग प्रकरणातील (Drug Case) अनेक धागेदोरे हाती लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक महत्त्वाची कामगिरी फत्ते केली आहे. दाऊदच्या अड्ड्यावर टाकलेला छापा एनसीबीसाठी मोठी कारवाई ठरली आहे. डोंगरी याठिकाणी टाकण्यात आलेल्या या छाप्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रगचा संपूर्ण कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. दरम्यान एनसीबीने केलेल्या या छापेमारीमध्ये काही प्रमाणात हत्यारं देखील जप्त करण्यात आली आहेत. शिवाय कोट्यवधी रुपयांची रोखरक्कम देखील या छापेमारीमध्ये जप्त करण्यात आली आहे. एनसीबीच्या कारवायांपैकी ही एक महत्त्वाची कारवाई आहे. दरम्यान यानंतरही डोंगरी भागात छापेमारी सुरूच आहे. चिंकू पठाणला एनसीबीने बुधवारी ताब्यात घेतलं होतं, त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीमधून एनसीबीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने (NCB) धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बुधवारी बेड्या ठोकल्या. चिंकू पठाण (Gangster Chinku Pathan arrested) हा गँगस्टर करीम लालाचा (Karim lala) नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

(हे वाचा-नवीन कपडे नाही म्हणून समोर येईल त्याला भोसकले, ठाण्यातील थरकाप उडवणारी घटना)

अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबई अंमली पदार्थ तस्करी करण्याचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाणला पकडले. त्याला नवी मुंबईतील घणसोली याठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

अंमली विरोधी पथकाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक आहे. तसंच तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर मुंबई अंमली पदार्थ तस्कारांना मोठा हादरा बसला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 21, 2021, 9:37 AM IST
Tags: Drugs

ताज्या बातम्या