‘ड्रग्ज’ प्रकरणात NCBचे मुंबईत 5 ठिकाणी छापे, बॉलिवूडचा अभिनेता रडारवर

‘ड्रग्ज’ प्रकरणात NCBचे मुंबईत 5 ठिकाणी छापे, बॉलिवूडचा अभिनेता रडारवर

नव्या माहितीच्या आधारे NCB 5 ठिकाणी छापे घालून शोधकार्य केलं. त्या अभिनेत्याच्या घरीही अधिकाऱ्यांनी चौकशी केली मात्र तो घरीच नसल्याचं त्यांना आढळून आलं आहे.

  • Share this:

मुंबई 21 ऑक्टोबर: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबईत बॉलिवूड आणि ड्रग्ज याच्या संबंधाचा मोठा खुलासा झाला होता. त्यानंतर NCBने त्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यात आता दररोज नव नवीन माहिती बाहेर येत असून अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत. नवीन माहिती मिळाल्याने NCBने मुंबईत बुधवारी 5 ठिकाणी छापे घातले. बॉलिवूडचा अभिनेता NCBच्या रडावर असून तो गेल्या काही दिवसांपासून सापडत नसल्याची माहिती NCBच्या सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी NCBने Agisialos Demetriades या आफ्रिकन आरोपीला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्याच्या चौकशीत या अभिनेत्याचं नाव समोर आलं होतं. हा अभिनेता ड्रग्जसाठी या आरोपीच्या संपर्कात होता अशी माहिती NCBला मिळाली होती. त्यानंतर तपासाची चक्रे त्या दिशेने वळली होती.

नव्या माहितीच्या आधारे NCB 5 ठिकाणी छापे घालून शोधकार्य केलं. त्या अभिनेत्याच्या घरीही अधिकाऱ्यांनी चौकशी केली मात्र तो घरीच नसल्याचं त्यांना आढळून आलं आहे. या आधी या अभिनेत्या समन्स बजावण्यात आला होता. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अभिनेता ताब्यात आला तर आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यालाही या प्रकरणात अकट करण्यात आली होती. रिया सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आली आहे. ड्रग्ज तस्कर यांना ड्रग्जचा पुरवढा करत असत आणि त्यांच्याकडून मग विविध ठिकाणी त्याचा पुरवढा केला जात असे असा आरोप आहे.

NCB विरोधात सुशांतच्या घरातली व्यक्ती हायकोर्टात; ठोकला 10 लाखांचा दावा

या प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांची नावंही समोर आली होती. त्यानंतर त्यांची चौकशीही झाली आहे. या प्रकरणात काही चॅटही समोर आले होते. त्या माहितीच्या आधारे NCBने चौकशी केली होती. बॉलिवूड आणि ड्रग्ज याचं कनेक्शन हे फार जुनं असून अशा काही घटना घडल्या की त्याच वेळी त्याची चर्चा होते. मात्र नंतर काहीच होत नाही असं मत व्यक्त केलं जातं.

या प्रकरणी मोठं आंतरराष्ट्रीय रॅकट असून ते उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही असं मत अनेक कलाकारांनी व्यक्त केलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 21, 2020, 7:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या