Home /News /mumbai /

Mumbai Drug bust: Cruise वरील कारवाईनंतर NCBची नवी मुंबईत छापेमारी

Mumbai Drug bust: Cruise वरील कारवाईनंतर NCBची नवी मुंबईत छापेमारी

NCB raid in Navi mumbai after drug party bust on cruise: एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आता नवी मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रुझवर ड्रग्ज पार्टीचा (Drug party busted in Cordelia Cruise ship) एनसीबीने पर्दाफाश केला. यावेळी एनसीबीने घटनास्थळावरुन 10 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan Son Aryan Khan) याचाही समावेश आहे. एनसीबीकडून या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर आता एनसीबीकडून नवी मुंबईत छापेमारी (NCB raids in Belapur Navi Mumbai) करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी कारवाई केल्यानंतर तेथून ताब्यात घेतलेल्यांची एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीच्या आधारे एनसीबीने नवी मुंबईत छापेमारी केली आहे. नवी मुंबईतीली बेलापूर परिसरात ही कारवाई सुरू आहे असं ट्विट न्यूज एजन्सी एएनआयने केलं आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान NCB च्या ताब्यात मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. एनसीबीनं आर्यन खानलाही ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरु आहे. अभिनेत्याच्या मुलाचा दावा NCB सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या बड्या अभिनेत्याच्या मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. चौकशीत त्याने सांगितले की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याला तेथे व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन आकारण्यात आलेले नव्हते. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की जवळपास 80000 रुपये एन्ट्री फी घेण्यात आली होती. मात्र, रात्री चौकशी दरम्यान अभिनेत्याच्या मुलाने सांगितले की, आपल्या नावाचा आणि चेहऱ्याचा वापर करण्यात आला जेणेकरुन इतरांना वाटेल की इतक्या मोठ्या सेलिब्रेटीचा मुलगा क्रूझवर आहे तर आपणही क्रूझवर पार्टीला जायला हवे. दिल्लीतील दोन तरुणीही एनसीबीच्या जाळ्यात श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटींची या पार्टीला हजेरी होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यात दोन तरुणींना देखील ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही तरुणी दिल्लीतल्या आहेत. या तरुणी पार्टीसाठी मुंबईत आल्या होत्या. दोघीही दिल्लीतल्या व्यापारी कुटुंबाशी संबधित आहेत. सध्या एनसीबी त्यांची चौकशी करत आहे. कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्ज पार्टी मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे. या क्रुझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हे क्रुझ गोव्याला निघाले होते. ड्रग्स पार्टी सुरू होताच एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्टीत सहभागी झालेल्यांनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरविअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईत अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली. या माहितीच्या आधारे एनसीबीनं छापा टाकून ही कारवाई केली आहे. काय घडलं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. 3 दिवस चालणार होती क्रुझवर ड्रग्स पार्टी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या पथकांनी अनेक ड्रग्स तस्कारांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मुंबईत ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे. अशाच मुंबईच्या धर्तीवरून निघून मोकळ्या समुद्रात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, एनसीबीने मोठ्या शिताफीने ही पार्टी उधळून लावली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Drug case, Mumbai, NCB

    पुढील बातम्या