मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नवाब मलिकांच्या आरोपाने NCB सापडली कोंडीत, म्हणे, भानुशाली आणि गोसावी तर साक्षीदार!

नवाब मलिकांच्या आरोपाने NCB सापडली कोंडीत, म्हणे, भानुशाली आणि गोसावी तर साक्षीदार!

मलिक यांनी जे काही आरोप केले आहे, ते तथ्यहीन आहेत. तपास यंत्रणेला हे बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.

मलिक यांनी जे काही आरोप केले आहे, ते तथ्यहीन आहेत. तपास यंत्रणेला हे बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.

मलिक यांनी जे काही आरोप केले आहे, ते तथ्यहीन आहेत. तपास यंत्रणेला हे बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 06 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी (aryan khan arrest)  राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात NCB आता पुरती कोंडीत अडकली आहे. मलिकांच्या आरोपानंतर NCB ला पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी मलिक यांचे आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले पण, मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे साक्षीदार असल्याचा अजब दावाच केला आहे.

एनसीबीचे डीडीजी ज्ञानेंद्रकुमार सिंग यांनी मुंबई तातडीने पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

मेफोड्रॉल , चरस, कोकेन आरोपींकडे आढळून आले आहे.  सर्व पंचनामा कायद्यानुसार केले आहे.  सर्व नियमांनुसार कारवाई केली आहे, असंही सिंग यांनी सांगितलं.

तालिबानी सत्तेत कृरतेचा कळस! चोरीच्या आरोप असलेल्या तिघांना घातल्या गोळ्या

तसंच, नवाब मलिक यांनी ज्या दोन व्यक्तींचा उल्लेख केला. त्याबद्दल सिंग यांनी अजब दावा केला. प्रभाकर सैद, किरण गोसावी, मनीष भानुशाली हे साक्षीदार आहेत, असा दावाच सिंग यांनी केला.

क्रुझवर झालेल्या कारवाईमध्ये आम्ही 8 आरोपांनी आम्ही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये त्यांच्याकडे ड्रग्स होते. यावेळी १ लाख ३३ हजार रुपये त्यांच्याकडे होते.  जोगेश्वरी इथं छापा मारला होता. अब्दुल कादीर शेखला ताब्यात घेतलं होतं,  क्रुझवर झालेल्या पार्टीच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या चार लोकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ज्ञानेंद्रकुमार सिंग यांनी दिली.

किरण गोसावी, मनीष भानुशाली हे जर साक्षीदार होते तर ते आरोपींना ताब्यात कसे घेऊ शकतात, असा सवाल विचारला असता सिंग यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही आणि पत्रकार परिषद आटोपती घेतली.

नवाब मलिक यांचा काय आहे आरोप?

'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

'जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत टक्कल असलेला एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडिओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडिओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

T20 World Cup आधी 4 भारतीय बॉलर तुफान फॉर्ममध्ये, एकावर टांगती तलवार!

या व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं आहे.

के.पी. गोसावीचा एनसीबीसोबत नेमका काय संबंध आहे हे सांगावं? जर हे एनसीबीचे अधिकारी नाही आहेत तर दोन हायप्रोफाईल आरोपींना नेण्याचं काम यांनी कसं केलं? प्रायव्हेट लोकांना हायर करण्याचे अधिकारी NCB ला आहेत का? असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले.

First published: