मुंबई, 9 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) एक मोठा झटका बसला आहे. एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई करत दाऊदचा जवळचा हस्तक असलेल्या आरिफला बेड्या ठोकल्या आहेत. एनसीबीने (NCB) बुधवारी मुंबईत (Mumbai) कारवाई करुन मोहम्मद आरिफ (Mohammed Arif) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. एनसीबीची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. (NCB arrested drug peddler Mohammed Arif in Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आरिफ हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. अंमली पदार्थ तस्करीत त्याचा मोठा सहभाग असायचा. लहान मुलांच्या मार्फत आरिफ अंमली पदार्थांची तस्करी करत असे. या प्रकरणात एनसीबीने बुधवारी त्याला मुंबईतून अटक केली आहे.
NCB, Mumbai says it arrested a drug peddler, Mohammed Arif, with MD drug worth Rs 10 lakhs in illegal market from Reay Road yesterday
He was absconding in 3 cases including a drugs case related to Chinku Pathan considered to be an aide of Dawood Ibrahim, the agency says pic.twitter.com/B5VeRBslX0 — ANI (@ANI) September 9, 2021
शिर्डी हादरली ! आधी झालं भांडण नंतर मिटला वाद, मग झाली पार्टी अन् एकाची हत्या
अटक करण्यात आली त्यावेळी एनसीबीने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत साधारणत: 10 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरिफ मोहम्मद हा चिंकू पठाण प्रकऱणात फरार होता.
काही दिवसांपूर्वी आरिफने एका गर्भवती महिला पोलीस कर्मचारीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात गर्भवती महिला पोलीस कर्मचारीचा गर्भपात झाला होता. आरिफ हा अट्टल गुन्हेगार असून त्याची पत्नी रोमा ही देखील अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असते. काही दिवसांपूर्वी एनसीबीने रोमाला अटक केली होती सध्या ती जामीनावर बाहेर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dawood ibrahim, Mumbai, NCB