NCBची मुंबईत मोठी कारवाई; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा अटकेत, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

NCB raided in Mumbai seized crores of rupees drugs: एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

NCB raided in Mumbai seized crores of rupees drugs: एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

  • Share this:
मुंबई, 22 जून: नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईत (Mumbai) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपयांत (Crores of Rupees drugs seized) असल्याची माहिती समोर आली आहे. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा ड्रग्जच्या विळख्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील गोरेगाव परिसरात छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी श्रेयस केंजाळे नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे श्रेयस हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 9 किलोग्रॅम चरस (Hashish), 436 एलएसडी ब्लॉट्स (LSD blots) आणि 300 ग्रॅम गांजा (Marijuana) जप्त केला आहे. मुंबईत चक्क केक आणि पेस्ट्रीतून ड्रग्जचा पुरवठा; NCBचा बेकरीवर छापा, महिलेसह तिघांना अटक तर दुसऱ्या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन बाईक्स जप्त केल्या आहेत. त्यासोबतच 17.3 किलोग्रॅम चरस (Hanish) जप्त केल्या आहेत. ही कारवाई मुंबईतील दादर परिसरात 22 जून रोजी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बाईक्सचा वापर ड्रग्जची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांनी राजविंदर सिंग आणि गुरमित सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून याच्याशी संबंधित आणखी काही धागेदोरे हाती लागत आहेत का याचा तपास करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published: