मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

रिक्षाचालकाला अडवून 20 ग्रॅम कोकोन जप्त; मुंबईत NCB कडून धडक मोहीम, 3 गुन्हे दाखल

रिक्षाचालकाला अडवून 20 ग्रॅम कोकोन जप्त; मुंबईत NCB कडून धडक मोहीम, 3 गुन्हे दाखल

अंमली पदार्थ बाळगणे आणि अवैध तस्करीविरूद्ध पाळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त एनसीबीने मुंबईतील अंमली पदार्थ पुरवठादार आणि विक्रेत्यांविरोधात आठवड्याभराचे तीव्र अभियान सुरू केले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 जून : अमली पदार्थ बाळगणे आणि अवैध तस्करीविरूद्ध पाळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त एनसीबीने मुंबईतील अमली पदार्थ पुरवठादार आणि विक्रेत्यांविरोधात आठवड्याभराचे तीव्र अभियान सुरू केले आहे. एनसीबी मुंबईतील विविध ठिकाणी 3 गुन्हे दाखल केले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरवर्षी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन 26 जून रोजी साजरा केला जातो.

या कारवाईत एक एलएसडी ब्लॉटस (व्यावसायिक प्रमाण), मेफेड्रोन (व्यावसायिक प्रमाण) आणि गांजा 17 जूनला जप्त केला. या वेळी, आरोपी सचिन तुपे, अफसर खान आणि फहाद सलीम कुरेशी या तीन भारतीय नागरिकांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वीड बेकरी प्रकरणी एनसीबीने मरोल परिसरातून सचिन तुपेला त्याच्या एका सहकाऱ्यासह अटक केली. या वेळी, त्यांच्याकडून एलएसडी (11 ब्लॉट्स – व्यावसायिक प्रमाण) जप्त केले. सध्या तुपे पुढील तपासासाठी एनसीबीच्या ताब्यात आहे.

एनसीबी मुंबईच्या पथकाने गोरेगाव (पश्चिम) येथील एक ऑटो चालक अफसर खान याला अडवून 20 ग्रॅम कोकेन जप्त केले. अफसर मीरा रोड मुंबई येथील एका आफ्रिकन नागरिकाला कोकेन पुरवत होता. ही आफ्रिकन व्यक्ती दररोज सकाळी मागणीनुसार उच्च वर्गातील ग्राहकांना कोकेन वितरण करत असे. एनसीबीतर्फे या आफ्रिकन नागरिकाला शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं वानखेडे म्हणाले.

हे वाचा - जबाबदारी मोठी आहे! Father’s Day निमित्त पतीला दिलं स्पेशल गिफ्ट; VIDEO पाहून म्हणाल नको रे बाबा!

मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे एनसीबी मुंबईने 18 जूनला माहीम परिसरातील घराची झडती घेतली. या वेळी, अवैध विक्रीसाठी साठा केलेला 60 ग्रॅम एमडी आणि 360 ग्रॅम गांजा जप्त केला. तसंच, एका व्यक्तीला चौकशीसाठी व पुढील तपासासाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.

First published:

Tags: Mumbai News, NCB