मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'पत्रास कारण की... आज बाळासाहेब असते तर..', क्रांती रेडकरचे उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र, इथे वाचा संपूर्ण Letter

'पत्रास कारण की... आज बाळासाहेब असते तर..', क्रांती रेडकरचे उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र, इथे वाचा संपूर्ण Letter

मुंबईतील ड्रग छापेमारीनंतर घडत असणाऱ्या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना भावनिक साद घातली आहे.

मुंबईतील ड्रग छापेमारीनंतर घडत असणाऱ्या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना भावनिक साद घातली आहे.

मुंबईतील ड्रग छापेमारीनंतर घडत असणाऱ्या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना भावनिक साद घातली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 28 ऑक्टोबर: या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं (NCB Raid Mumbai) मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीचा (Mumbai Drugs Party) पदार्फाश केला. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीच्या या कारवाईवर एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोप केले, त्यांनी काही सवालही उपस्थित केले होते. आता हे प्रकरण इतकं पेटलं असून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे राज्यात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा संघर्ष (Sameer Wankhede Vs Nawab Malik) पाहायला मिळाला. या दरम्यान समीन वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पत्रकार परिषद (Sameer Wankhede Wife Kranti Redkar Press Conference) वानखेडे कुटुंबीयांची भूमिका मांडली होती. त्यानंतर क्रांतीने हिंदी तसंच मराठी वृत्त वाहिन्यांना मुलाखती देऊन तिची बाजू स्पष्ट केली आहे.

या घडामोडीदरम्यान आज अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक ट्वीट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने बाळासाहेबांची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली आहे.

हे वाचा-समीर वानखेडेंची साडे चार तास चौकशी, NCB वरिष्ठ अधिकारी म्हणाले...

क्रांतीने काय म्हटलं आहे पत्रात?

क्रांतीने तिच्या कुटुंबीयांना होणारा त्रास या पत्रात नमूद केला आहे. तिने असं म्हटलं आहे की- 'माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच  मी वाढले... कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे... सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायंत.'

 माननीय उद्धव ठाकरे साहेब @CMOMaharashtra पत्रास करण की … pic.twitter.com/0VJxURk5oi

तिने पुढे असं म्हटलं आहे की, 'मी  एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही. आणि मला यात पडायचंसुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.'

हे वाचा-सांभाळून बोला, हमाम में सब नंगे है! जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरांना इशारा

बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत क्रांती या पत्रात म्हणाली आहे की, 'आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं... एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरुप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे... आज ते नाही पण तुम्ही आहात... त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो... तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे... तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे... म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय... तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती. आपली बहिण, क्रांती रेडकर.'

First published:

Tags: Marathi actress, Uddhav tahckeray