मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : मुंबईत क्रुझवर फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्सचा तडका, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी NCB च्या जाळ्यात!

BREAKING : मुंबईत क्रुझवर फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्सचा तडका, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी NCB च्या जाळ्यात!

एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.  पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 02 ऑक्टोबर : मुंबईच्या अरबी समुद्रात एका आलिशान क्रुझवर फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश अंमली विरोधी पथक अर्थात NCB ने केला आहे. या क्रुझवर जवळपास 1500 लोक होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. NCB ने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात  Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला.

या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. एनसीबीच्या पथकाकडून अजून छापे सुरू आहे. लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

पैशांसाठी काहीही! ATMसमोर डोकं टेकलं, हात जोडले; तरुणीने काय काय केलं पाहा VIDEO

एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.  पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे.

NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. आतापर्यंत या कारवाईमध्ये 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अजूनही चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Mumbai, NCB