NCBने मुंबईत उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

NCBने मुंबईत उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

Drug racket in Mumbai: अन्सारी हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला एक मोहोरा असून त्याच्या मागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई 28 ऑक्टोबर: मुंबईत Narcotics Control Bureau म्हणजेच NCBने मोठं ड्रग्ज रॅकेट ( Drug racket in Mumbai) उद्ध्वस्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत NCBची धडक कारवाई सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू नंतर ड्रग्जचं प्रकरण बाहेर आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर NCBने अंमली पदार्थांचा व्यापार करणारे अनेक रॅकेट्स उद्ध्वस्त केले आहेत. NCBने मुंबईतल्या डोंगरी भागात ही कारवाई केली असून अखलाक अहमद अब्दुल अन्सारी या तस्कराला अटक केली आहे.

या तस्कराकडे MD ड्रग्ज सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 30 लाख एवढी आहे. अन्सारी विरुद्ध या आधीही गुन्हे नोंदवलेल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

NCBने मंगळवारी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला होता. कतारहून एका जहाजामध्ये हा माल येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. अन्सारीच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. अन्सारी हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला एक मोहोरा असून त्याच्या मागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लग्न होईना म्हणून फिल्मी स्टाइल बदला; तरुणानं शेजाऱ्याच्या दुकानावर JCB चढवला

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूनंतर ड्रग्ज अँगलच्या तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन (bollywood drug connection) समोर आलं. आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणची (deepika padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या (karishma prakash) घरीच ड्रग्ज सापडले आहेत.

घरात बसून बापलेकं छापत होते 200 रुपयांच्या बनावट नोटा, असा झाला पर्दाफाश

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करण्यात आली होती.  रिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. ती या ड्रग्ज पेडलर्सच्या सातत्याने संपर्कात होती, असं उघड झालं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तिच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. तिच्या घरातून  1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 28, 2020, 5:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या