मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार फारुख बटाटाच्या मुलाला अटक, NCB ची मोठी कारवाई

मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार फारुख बटाटाच्या मुलाला अटक, NCB ची मोठी कारवाई

मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा फारुख बटाटा (Drug Supplier Farukh Batata) याच्या मुलाला गुरुवारी रात्री अटक केली आहे. शादाब बटाटा  (NCB Arrests Drug Supplier Shadab Batata) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 26 मार्च : NCBनं मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा फारुख बटाटा (Drug Supplier Farukh Batata) याच्या मुलाला गुरुवारी रात्री अटक केली आहे. शादाब बटाटा (NCB Arrests Drug Supplier Shadab Batata) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. एनसीबीने गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. यात मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज जप्त करण्यात आले, याची बाजारातील किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय एनसीबीनं महागड्या गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत.

शादाब बटाटा मागील बऱ्याच काळापासून ड्रग्ज पुरवठा करण्याचं काम करतो. मुंबईतील बॉलिवूड कलाकारांनाही तो ड्रग्ज पुरवठा करायचा. शादाबचा तपास एनसीबी गेल्या अनेक दिवसांपासून करत होती. मात्र, गुरुवारी रात्री करण्यात आलेल्या छापेमारीत एनसीबीला मोठं यश मिळालं आहेय एनसीबीनं त्याच्याकडून पैसे मोजण्याची मशीनही जप्त केली आहे.

मुंबईमध्ये एमडीएमएशिवाय विदेशातून येणाऱ्या एलएसजी, गांजा, कोकीन यासारख्या ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा फारुख बटाटावाला करतो. हाय प्रोफाईल लोकांमध्ये त्याची चांगली ओळख आहे. मुंबईतील प्रत्येक बार आणि मोठ्या ड्रग्ज पार्टीमध्ये तोच ड्रग्ज पुरवतो. मुंबईतील ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यातलं सर्वात मोठं नावं फारुख शेख उर्फ फारुख बटाटा आहे. फारुख सुरुवातील बटाट्याची विक्री करायचा. याचवेळी तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि आज तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार आहे. आता ड्रग्जच्या दुनियेचं संपूर्णा काम त्याची दोन मुलं सांभाळतात. अशातच आता त्याचा मुलगी शादाबला गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime, Drug case, Drugs, Maharashtra, Mumbai, NCB