Home /News /mumbai /

कोट्यवधींच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहतो मुंबईचा टॅक्सी ड्रायव्हर; ड्रग्ज केसमध्ये NCB ने केला पर्दाफाश

कोट्यवधींच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहतो मुंबईचा टॅक्सी ड्रायव्हर; ड्रग्ज केसमध्ये NCB ने केला पर्दाफाश

कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिच्या पतीला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर NCB ला ड्रग पॅडलर्सने अनेक धागेदोरे हाती लागले आहेत. मुंबईच्या आलिशान इमारतीत राहणाऱ्या एका टॅक्सीवाल्याला या प्रकरणी अटक केली आहे.

    मुंबई, 26 नोव्हेंबर : काम काय तर मुंबईत टॅक्सी चालवणे, पण राहतो कुठे तर मुंबई सेंट्रलमधल्या अत्यंत उच्चभ्रू आणि महागड्या इमारतीतल्या आलिशान फ्लॅटमध्ये. नवाब शेख या टॅक्सी ड्रायव्हरचा नार्कोटिक्स विभागाच्या (NCB ) कारवाईत पर्दाफाश झाला आहे. नवाब शेख ड्रग पेडलर (Drug peddler) म्हणून कार्यरत असल्याचं समोर आलं आणि NCB ने त्याला बेड्या ठोकल्या. कॉमेडियन भारती सिंह (Bharti singh) आणि तिच्या पतीला (Harsh Limabchiya) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर NCB ला ड्रग पॅडलर्सने अनेक धागेदोरे हाती लागले आहेत. त्यातच NCB ने काही महत्त्वाच्या ड्रग पेडलर्सना गुरुवारी अटक केली. नवाब शेख आणि फारुख चौधरी नावाच्या दोन ड्रग पेडलर्सकडून 32.9 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. शिवाय LSD चे 10 बॉट्स त्यांच्याकडे सापडले. याकला नवाब शेख मुंबई सेंट्रल इथल्या नाथानी हाइट्स नावाच्या आलिशान इमारतीत राहतो, असं तपासात समोर आलं. कोट्यवधींचा फ्लॅट असलेला हा नवाब शेख सकृतदर्शनी टॅक्सी चालवण्याचं काम करतो. त्याच्या घरावरच NCB ने छापा मारला. त्या वेळी फारुख चौधरी त्याच्याकडे ड्रग्ज कन्साइनमेंट घेऊनच आलेला होता. NCB ने दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) यांना ड्रग प्रकरणात (Drug Case) कोर्टानं जामीन दिला आहे. पण त्यांना ड्रग्ज पुरवणारा NCB च्या अटकेत आहे. NCB नं आणखी एका ड्रग्स पॅडलरला अटक केली आहे. तो कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला गांजा सप्लाय करत होता, असं NCB च्या सूत्रांकडून समजतं. या ड्रग्ज पेडलर्सकडून आणखी माहिती हाती यायची शक्यता आहे. भारती सिंह पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येऊ शकतात. बॉलीवूड कनेक्शनही तपासण्यात येत आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पॅडलरकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणापासून सुरू झालेल्या या तपासात यापूर्वी बॉलिवूडमधल्या अनेक सेलेब्रिटींची चौकशी NCB ने केली आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान पासून अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रॅबिएलापर्यंत अनेकांना नार्कोटिक्स विभागाने चौकशीसाठी बोलावलं होतं. पण अद्याप मोठी अटक झालेली नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Drugs

    पुढील बातम्या