Home /News /mumbai /

Breaking: ड्रग्ज प्रकरणात मुंबईमध्ये मोठी घडामोड, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला अटक

Breaking: ड्रग्ज प्रकरणात मुंबईमध्ये मोठी घडामोड, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला अटक

Mumbai Drug Case: मुंबईतील ड्रग केस प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. एनसीबीने एक मोठी कारवाई मुंबईत केली आहे.

  मुंबई, 19 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून (NCB) ड्रग्ज प्रकरणात मोठमोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अनेक कलाकारांच्या घरावरही या प्रकरणात (Drug Case) छापेमारी करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग पेडलिंग प्रकरणात अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. एनसीबीने मुंबईच्या डोंगरी (Dongri) भागात छापेमारी करून ही कारवाई केली आहे. या अग्निशमन दलाच्या जवानाच्या एका साथीदारालाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) अटक केली आहे. दोघांकडून एमडी जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक तपास एनसीबीकडून सुरू आहे. ड्रग प्रकरणाची पाळमुळं कुठवर गेली आहेत याचा तपास एनसीबीकडून सुरू आहे. एनसीबीच्या मुंबई दलाने ही कारवाई केली आहे. एनसीबीने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी केली होती. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. MD नावाचे ड्रग दोघांकडून जप्त करण्यात आले आहे सोमवारी देखील एनसीबीकडून यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. सोमवारी ड्रग प्रकरणात दोन नायजेरियन लोकांना अटक करण्यात आली होती. एमडी आणि कोकेनची तस्करी करणाऱ्या या दोघांना अटक केली गेली होती. 500 ग्रॅम एमडी, चरस आणि गोळ्यांच्या माध्यमातुन कोकेनची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामध्ये हायप्रोफाइल लोकं असल्याची धक्कादायक माहिती मिळते आहे. जुहूमधल्या जेडब्ल्यू मॅरियेट हॉटेलमसमोर हायप्रोफाईल ग्राहकांना नायजेरीन पेडलर कोकेनच्या गोळ्या विकत असल्याचं निष्पन्न झालं होतं. धक्कादायक म्हणजे एनसीबीने अटक करताना त्याने त्याने कोकेनच्या सर्व गोळ्या गिळल्या. सोमवारी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या नायजेरियन पेडलरकडून NCB ने आतापर्यंत कोकेनच्या 12 कॅप्सूल्स जप्त केल्या आहेत.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Drugs

  पुढील बातम्या